अखेर न्याय मिळाला… भीम पराक्रमी खेळाडूचं भारत अ संघात पुनरागमन 9 वर्षांआधी ब्रिटिशांनाच धडकी भरवली

0
1

मुंबई: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला आहे. शुभमन गिलला संघाचे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय संघात काही नवीन खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. काही खेळाडूंचा कमबॅकही झालेला पाहायला मिळत आहे. करुण नायरला भारतीय संघात पुन्हा संधी मिळाली आहे. तब्बल 9 वर्षानंतर करुण नायरला पुन्हा संघात संधी मिळाली आहे.

बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय भारत अ संघाची घोषणा केली आहे. ही मालिका अनेक प्रकारे महत्त्वाची असणार आहे. या दौऱ्यात भारत अ संघाचे नेतृत्व सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन करेल आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय अनेक तरुण खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे. त्याच वेळी, असा एक खेळाडू देखील आहे जो 9 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करण्यात यशस्वी झाला आहे. या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करून भारत अ संघात आपले स्थान निर्माण केले आहे. करुण नायरला भारताच्या मुख्य संघातही आता स्थान मिळाले आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

अखेर, अनुभवी फलंदाज करुण नायर भारतीय संघात परतला आहे. करुण नायरची भारतीय संघात परतण्याची नऊ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. करुण नायरने इंग्लंडविरुद्ध 2016 ला त्रिशतक मारले होते. या इतक्या उल्लेखनीय कामगिरीनंतरही त्याला भारतीय संघातून ड्रॉप करण्यात आले होते. आता पुन्हा इंग्लंडविरुद्धच त्याला संघात स्थान मिळाले आहे. गेले कित्येक वर्ष तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करताना दिसत आहे. यावर्षी करुण आयपीएलमध्येही खेळताना दिसला. दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावात करुणला 50 लाख रुपयांना विकत घेतले.

2024-25 मध्ये रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भासाठी करुण नायर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने नऊ सामन्यांमध्ये 836 धावा केल्या. या देशांतर्गत हंगामात, त्याने प्रथम श्रेणी आणि लिस्ट-वन क्रिकेटमध्ये एकत्रितपणे 1600हून अधिक धावा केल्या, ज्यामध्ये 9 शतकांचा समावेश होता. दुसरीकडे, तो 2023 आणि 2024 मध्ये काउंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळला आणि दहा सामन्यांमध्ये 56.61 च्या सरासरीने 736 धावा करण्यात यशस्वी झाला

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा