ही फाईल चुकूनही क्लिक करू नका.. आधी ड्रोन हल्ले आणि आता व्हायरस, पाकच्या कुरापती थांबेनात !

0

भारतात शांतता नांदत असली ती पाकड्यांच्या हमखास पोटात दुखतंच. गेल्या महिन्यात पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा पाकपुरस्कृतच होता, हे भारताने वेळोवेली स्पष्ट करूनही पाकचा कांगावा सुरूच आहे. आधी दहशतवादी मग भारताने हल्ला केल्यावर पाकचा जळफळाट झाल्यावर त्यांनी भारतावर थेट ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने तो हाणून पाडल्यावरही पाकची अक्कल काही ठिकाणावर येत नाही. त्यांच्या नव्.ा कुरापती सुरूच असून एका व्हायरसचा वापर करत पाकने सायबर अटॅकचा प्रयत्न केला आहे. या व्हायरसला त्यांनी नवं शस्त्र बनवून भारतीयांना त्रास देण्याचा नवा मार्ग शोधला आहे.

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले, आता पाकिस्तान इंटरनेटच्या माध्यमातून भारतीयांना हानी पोहोचवण्याचा एक नवीन कट रचत आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तान आता भारतावर सायबर हल्ल्याची तयारी करत आहे आणि त्यासाठी डान्स ऑफ द हिलरी नावाचा धोकादायक व्हायरस एका फाईलमध्ये टाकून सोशल मीडियावर सर्क्युलेट केला जात आहे.

जर तुम्हाला व्हॉट्सॲप, फेसबूक, टेलिग्राम किंवा ईमेलवरही एखादी अनोळखी फआील किंवा लिंक आली तर त्यावर चुकूनही क्लिक करू नका, कारण तुमची ही छोटीशी चूक फारच महागात पडू शकते. या फाइलमध्ये असे मालवेअर आहे जे तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकते आणि आर्थिक नुकसानही करू शकते.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार

Dance of the Hillary म्हणजे काय ?

हा एक धोकादायक मालवेअर आहे जो व्हिडिओ फाइल्स आणि कागदपत्रांच्या स्वरूपात प्रसारित केला जात आहे. एकदा का हे मालवेअर तुमच्या डिव्हाइसमध्ये शिरले की ते सक्रिय होईल आणि तुमचे बँकिंग तपशील चोरीला जाण्याचा धोका वाढू शकतो, असा इशारा सुरक्षा तज्ञांनी दिला आहे. हा व्हायरस तुमच्यापर्यंत अज्ञात लिंक किंवा अटॅचमेंटच्या स्वरूपात पोहोचू शकतो, जर तुम्हाला tasksche.exe नावाची फाइल आढळली तर या फाईलवर क्लिक करण्याची चूक करू नका.

Malware Attack पासून कसा कराल बचाव ?

अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा.

संशयास्पद लिंक्स आणि अटॅचमेंटवर क्लिक करणे टाळा.

मजबूत पासवर्ड वापरा.

कोणतेही ॲप डाउनलोड करताना काळजी घ्या.

Cyber Crime Helpline Number

जर तुम्ही चुकून एखाद्या अज्ञात फाईलवर क्लिक केले आणि योगायोगाने तुमचे नुकसान झाले, तर वेळ न दवडता न करता 1930 (नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर) वर कॉल करा आणि तुमच्यासोबत जे घडलं त्याची सविस्तर माहिती देऊन तक्रार नोंदवा.