मोदींनी विरोधकांना धक्का दिला, पण जातनिहाय जनगणनेचे ‘हे’ असणार फायदे अन् तोटे

0
1

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर केंद्रातील भाजप नेतृत्वानं आता बिहारच्या विधानसभा निवडणुकीवर आपला पूर्ण फोकस वळवला आहे. याचमुळे मोदी सरकारनं या निवडणुकीआधी मोठा काँग्रेससह विरोधकांवर मोठा डाव टाकत जातनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे. हा निर्णय बिहारच्या निवडणुकीत भाजपसाठी गेमचेंजर तर विरोधकांसाठी अडचणीत आणणारा ठरण्याची शक्यता आहे. पण मोदी सरकारच्या या जातनिहाय जनगणनेचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही असल्याचे बोलले जात आहे.

केंद्र सरकारच्या बुधवारी (ता.30) झालेल्या कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटिकल अफेअर्सच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीतील प्रचारापासून सातत्यानं जातनिहाय जनगणनेचा मुद्दा चर्चेत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलूनव धरत मोदी सरकारची मोठी अडचण केली होती. पण आता मोदी सरकारनं जातनिहाय जनगणनेबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जातनिहाय जनगणनेसंदर्भातील पत्रकार परिषदेत माहिती दिली. या निर्णयानंतर राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींच्या उलटसुलट प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. पण या जातनिहाय जनगणनेचे फायदे आणि तोटेही आहेत.

जातनिहाय जनगणनेचे फायदे काय…?

1- जातनिहाय जनगणनेमुळे देशात असलेल्या प्रत्येक जातींची आकडेवारी समोर येणार आहे.

2 – समाजात वाढत चाललेली सामाजिक असमानता कमी होण्यास मदत होणार आहे.

3 – भारतातील विविध जातींचे वास्तव चित्रण स्पष्ट होईल.

4 – मराठा समाजासह वेगवेगळ्या समाजाकडून होत असलेल्या आरक्षणाच्या मागण्यांवरही जातनिहाय जनगणना प्रभावी मार्ग ठरण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

5 – अलिकडेच जातनिहाय जनगणना झाली तर विकासाचा इतिहास, आणि पुढची रुपरेषा ठरवण्यास निश्चितच मोठी मदत होणार आहे.

6 – वर्षानुवर्षे शोषित राहिलेल्या किंवा विकासापासून वंचित राहिलेल्या समाजासाठी जातनिहाय जनगणना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

7 – जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक समानता निर्माण करण्यास मोठा वाव मिळेल.

8 – या निर्णयामुळे केंद्र वा राज्य सरकारला कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यास निश्चितच फायदा होईल.

जातनिहाय जनगणनेचे तोटे काय..?

1- जातनिहाय जनगणना झाली तर त्याचा वेगवेगळ्या निवडणुकांतील राजकीय मतांसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून वापर होण्याची शक्यता आहे.

2 – जातनिहाय जनगणनेचा राष्ट्रीय एकात्मतेवर दूरगामी परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

3 – भारतीय छोटछोट्या जातींच्या गुंतागुंतीच्या रचनांमुळे जातनिहाय जनगणनेवर मोठा खर्च होण्याची शक्यता आहे.

4 – जात आणि विविध पोटजातींमुळे तंतोतंत आकडेवारी काढणं मोठं आव्हानात्मक काम असणार आहे.

5 – जातनिहाय संख्याबळ समोर आल्यानंतर जाती-जातींमधील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.