श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या 32 वर्षातील पारदर्शक कारभारावर विश्वास टाकत कर्जदार भाग भांडवलदार आणि ठेवीदारांनी काल पार पडलेल्या निवडणुकीमध्ये स्व- हितार्थ सभासदांवर निवडणूक लादणाऱ्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचा ‘शर्म’नाक पराभव करत सिंहगड रोड परिसरात नावाजलेल्या श्री रामेश्वर सहकारी पतसंस्था कारभारात ढवळाढवळ करून संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘किडी’चा पक्का बंदोबस्त केला आहे. काल पार पडलेल्या मतदानामध्ये 90 टक्के मतांची पसंती श्री रामेश्वर पॅनलला देऊन संस्थेची भावी वाटचाल निश्चित करण्याचेही काम सभासदांच्या वतीने करण्यात आले आहे.
आर्थिक स्थिती सधन परिवारातील सर्व संचालक मंडळ, कर्ज वितरणातील नियमितता, संचालक कर्मचारी वर्गाची सौहार्दपूर्ण वागणूक याला पसंती देत श्री. रामेश्वर पॅनल प्रचंड बहुमताने विजयी होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. 32 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था 27000 भाग भांडवलाची संस्था आज ५७ कोटी कारभार करत असून आगामी काळामध्ये सभासदांनी टाकलेल्या प्रचंड विश्वासाच्या जोरावर अनेक अभिमानास्पद टप्पे पार करण्यात येणार असल्याचे संस्थापक बाळासाहेब हगवणे आनंद उत्सव कार्यक्रमांमध्ये जाहीर केले.
श्री रामेश्वर सहकारी पतसंस्थेमध्ये सध्या ठेवी ३३ कोटी पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून असून नव्या संचालक मंडळाच्या सक्रिय सहभागाने यामध्ये प्रचंड वाढ शक्य आहे. त्यातच दरवर्षी पतसंस्थेच्या वतीने केले जाणारे लाभांश वाटप अन् पतसंस्थेमार्फत देण्यात आलेल्या २४ कोटी कर्जाची ही नियमितता लक्षात घेता संस्थेच्या सभासदांच्या मनात ठेवी सुरक्षित असल्याबाबत कोणतीही शंका निर्माण होणार नाही यासाठी नव्या संचालकांनी काम करण्याचा संकल्प केला आहे.
श्री रामेश्वर सहकारी पतसंस्थेच्या पुढील वाटचालीमध्ये सभासदांना आर्थिक साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण व्यवस्था उभी करणे, पतसंस्थेची उलाढाल आगामी काळात २०० कोटी पर्यत करणे आणि एनपीए दर ०% करण्याचे ध्येय असून नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजक तरूणांना व्यवसाय उभारणी व विकासासाठी सुलभ कर्ज योजना राबविणे, नवीन आकर्षक व्याजदराच्या थेट योजना कार्यान्वित करणे, सभासदांना व्यक्तिगत विमा संरक्षण लाभ देण्याच्या योजना तयार करणे यासाठी श्री रामेश्वर पॅनलने मतदानाच्या दरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सर्व संचालक मंडळ बांधील राहील असेही संस्थापक बाळासाहेब हगवणे यांनी स्पष्ट केले.
श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था निकाल पत्र नमुना-
अ.क्र उमेदवाराचे नांव एकूण वैध मते निकाल
१ दांगट सचिन दशरथ १६०७ विजयी
२ दांगट विकास पंढरीनाथ १६२३ विजयी
३ गवांडे नागेश कान्हू १५५ पराभूत
४ घुले अभिजीत सोपन १५९८ विजयी
५ घुले बाळासाहेब काळूराम १६१६ विजयी
६ गुंजाळ सोमनाथ नामदेव १३६ पराभूत
७ हगवणे बाळासाहेब अर्जुनराव १६०० विजयी
८ हगवणे राजेंद्र गणपत १६०० विजयी
९ जाधव बाळकृष्ण श्रीरंग १४० पराभूत
१० लगड देवीदास एकनाथ १५६३ विजयी
११ मते विलास साधू १५३८ विजयी
१२ रोकडे विकास बबनराव १२६ पराभूत
१३ शर्मा राधेश्याम बन्सीलाल १६८ पराभूत
१४ शिंदे संजय सुबराव १०२ पराभूत
एकुण वैध मतपत्रिका :- १७६० अवैध मतपत्रिका संख्या :- १३४
श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसस्था मयादित, जयप्रकाश नारायणनगर नांदेड, पुणे संस्थेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपासभापती शेखर दांगट पाटील, नितीन दांगट पाटील, उपमहापौर दिलीपभाऊ बराटे, नगरसेविका वर्षाताई तापकीर, हभप दिलीपभाऊ बराटे, चंद्रकांत पंडित, राम बराटे खडकवासला अध्यक्ष सचिन मोरे, यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसरपंच सदस्य, अनेक मान्यवर, मतदार बंधू भगिनीसह नवनियुक्त संचालक मंडळाने ग्रामदैवताच्या आशीर्वादानंतर आनंद उत्सव साजरा केला.