नक्षलवाद विरोधात देशातील सर्वात मोठी कारवाई, 36 तास ऑपरेशन सुरू 700 नक्षलवाघांना १०००० पोलिसांनी घेरले

0
1

छत्तीसगडमध्ये दहशतवाद विरोधात मोठी कारवाई सुरक्षा दलांनी सुरु केली आहे. छत्तीसगड पोलीस डीआरजी, कोब्रा बटालियन व सीआरपीएफ अशा तीन तुकड्याच्या माध्यमांनी ऑपरेशन सुरु केले आहे. 36 तासांपासून ऑपरेशन सुरू आहे. 700 नक्षलवाघांना दहा हजार पोलिसांनी घेरले आहे. गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांमध्ये मायावी आणि मोस्ट वॉन्टेड कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा या ठिकाणी आहे. चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहे. हिडमा या चकमकीत बचावला आहे.

बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा या पहाडीवर नक्षलवाद्यांचे मुख्य सूत्रधार असलेले नेते वास्तव्य करतात. या भागांत 36 तासांपासून अभियान सुरु करण्यात आले आहे. छत्तीसगड पोलीस डीआरजी, कोब्रा बटालियन व सीआरपीएफ अशा तीन तुकड्याच्या माध्यमांनी ऑपरेशन सुरु केले आहे. या भागांत 700 च्या वर नक्षलवादी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यावर पोलीस बळ वाढवण्यात आले आहे. दहा हजार पोलिसांनी या पहाडीला घेराव केला आहे. साडेचार ते पाच तास चकमक चालली. त्यात सात नक्षलवाद्यांना कंट्स्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले. सध्या चकमक थांबली तरी कोंबिंग ऑपरेशन या भागात सुरूच आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

नक्षलवाद्यांचे मोठे नेते हिडमा, देवा यांना टार्गेट करण्यासाठी पोलिसांनी या पहाडीला घेराव केला आहे. हिडमा या चकमकीत थोडक्यात बचावला आहे. सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांना पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केले आहे. सुरक्षा दलांनी संवेदनशील छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर असलेल्या कर्रेगुट्टा टेकड्यांना वेढा घातला आहे. घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला हा परिसर माओवाद्यांच्या बटालियन क्रमांक १ चा अड्डा मानला जातो. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या पलायनाचे सर्व मार्ग बंद केले आहेत.

३१ मार्च २०२६ पूर्वी देशातील नक्षलवाद संपवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही महिन्यांपूर्वीच सांगितला आहे. त्या दृष्टिने देशाला नक्षलमुक्त करण्यासाठी कारवाई सुरु आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांत छत्तीसगडमधील विविध चकमकींत आतापर्यंत जवळपास १५० नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यात आला आहे. त्यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या एका वरिष्ठ नक्षली नेत्याचा समावेश आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला