निष्ठित कार्यकर्त्याच्या भाषणांचा संग्रह ‘ऐकलंत का?’चे अजितदादांच्या हस्ते होणार प्रकाशन

0

साहित्य, कलारसिक व्यक्तिमत्त्व, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या नर्मविनोदी भाषणांचे संकलन लिखित ““ ऐकलंत का? “” पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार २५ एप्रिल २०२५, सकाळी ११ वा. स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे ना. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न होणार आहे.

तळागाळातील कार्यकर्ता घडत असताना कोणत्या आव्हानांना सामोरे जातो आणि व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत असताना वाचन किती आवश्यक असतं याची जाणीव संबंधित व्यक्तिमत्व व्याख्याने देताना होत असते. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या आणि फक्त आपल्या संघटन कौशल्य व नर्म-विनोदी व्यक्तिमत्त्वाच्या जीवावर व्यासंग कसा वाढतो याची जाणीव या पुस्तकातून मिळणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. ना. बाबासाहेब पाटील सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे मा. ना. दत्तात्रय मामा भरणे क्रीडा व युवक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निमंत्रित केले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

प्रमुख उपस्थितीत मा. आ. दिलीपराव वळसे-पाटील मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा मा. रामदास फुटाणे जेष्ठ कवी वात्रटिकाकार, मा. आमदार श्री. शंकरभाऊ मांडेकर, मा. प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे सर अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहभागी होणार आहेत.