अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस पुण्यात सोसायटीत राडा; महिलांना केस ओढत मारहाण व्हिडिओ आता समोर

0
1

अनधिकृत बांधकाम काढायला सांगितल्याच्या रागातून पुण्यातील सोसायटीत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. दोन जणांनी सोसायटीतील सभासदांना मारहाण केली असून आरोपीकडून महिला सदस्यांचे केस ओढत मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आरोपीने महिलांना शिवीगाळ करत हाणामारी केल्याचे समोर आल्याने परिसरात मोठा गोंधळ झाला. धायरी भागातील सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी अनिल भीमरावजी दरोली यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मल्लिका समीर पायगुडे गाजरे आणि समीर मनोहर पायगुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार 11 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडला.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

नक्की घडले काय?

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पुण्यातील सिंहगड रोड भागात असलेल्या धायरी येथील रिद्धी सिद्धी पॅरडाइज या सोसायटीत गेल्या बारा वर्षांपासून राहत असून ते सोसायटीच्या सेक्रेटरीचेही काम बघतात. सोसायटीमधील एका फ्लॅटधारकाने सोसायटीतील पार्किंगमध्ये 15-20 दिवसांपूर्वी पत्रा लावून फॅब्रिकेशनचे काम सुरू केले होते. हा फ्लॅट आरोपींना राहण्यासाठी घरमालकाने दिला होता. मात्र हे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत सोसायटीने त्या फ्लॅट धारकाला बांधकाम काढून टाकावे अशी नोटीस पाठवली. नोटीस बजावल्यानंतरही बांधकाम न काढल्यामुळे सोसायटीने 13 एप्रिल रोजी सोसायटी सभासदांची पार्किंग मध्ये मीटिंग आयोजित करून सर्वांच्या संमतीने अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे ठरवले.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

बांधकाम काढण्याबाबत सोसायटीने पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी सुद्धा या जागेची पाहणी केली. बांधकाम काढण्यापूर्वी यातील आरोपी मल्लिका पायगुडे गाजरे यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली आणि सोसायटीतील इतर महिलांना शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तुम्ही आमच्या ऐकत नाही काय थांबा तुम्हाला दाखवतो असे म्हणत समीर पायगुडे हातातील लोखंडी रोड घेऊन फिर्यादी अनिल दरोली यांच्यावर धावून गेले. इतकेच नाही तर त्याने जमलेल्या महिला सभासदांचे केस सोडले आणि इतरांना मारहाणही केली. आरोपी मल्लिका पायगुडे गाजरे या महिलेने सुद्धा महिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 74, 118(1), 333, 352, 351(2), 351(3), 324(2) आणि 281नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ