देशातील राष्ट्रपुरुषांना हृदयात साठवून त्यांचा स्वाभिमान जपणारा बौद्ध समाजच – विनोद मोरे

0
2

मुंबई दि. १२ (रामदास धो. गमरे) “महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील गोविंदराव शेरीबा फुले तत्कालीन टाटा बिर्ला यांपेक्षाही श्रीमंत उद्योगपती होते परंतु पुण्याच्या ब्राम्हणांचे म्हणणे होत की जरी तुम्ही तालेवार श्रीमंत असला तरी तुम्ही शूद्र आहात त्यामुळे तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही म्हणून तुमच्या मुलाला शाळेतून काढून त्याचे शिक्षण बंद करा असे कारण शूद्र शिकला तर धर्मशास्त्रानुसार मोठा अनर्थ घडेल असा कांगावा करत त्यांच्यावर पुणेरी ब्राम्हणांनी दबाव आणला व त्यामुळेच ज्योतिबा फुलेंच शालेय शिक्षण बंद झालं परंतु बेग मुन्शी मुस्लिम बांधवाने व लिजीटसाहेब या मिशनरी ने ज्योतिबांना मिशनरी शाळेत प्रवेश मिळवून दिला त्यामुळेच ज्योतिबांना शिक्षण पूर्ण करण्यास मदत झाली, शिक्षणामुळे त्यांच्यात आमूलाग्र बदल होऊन शिक्षणाचे महत्त्व त्यांना उमवले म्हणूनच एकेदिवशी ते त्यांच्या पत्नी माता सावित्रीबाईंना म्हणाले की समाजातील अनिष्ठ रूढीपरंपरा बदलायच्या असतील गुलाम, शेतकरी, कामगार, मागासवर्गीय आणि स्त्रियांना गुलामीच्या जोखडातून मुक्त करायचे असेल तर शिक्षणाची कास धरली पाहिजे परंतु देश सुधारायचा असेल तर आधी गाव सुधारल पाहिजे आणि गाव सुधारायच्या आधी घर सुधारायला पाहिजे आणि घर हे फक्त त्या घरातील स्त्री सुधारू शकते म्हणून तळागाळातील, शूद्र, मागासवर्गीय, गुलामांना शिकवायच असेल तर आधी घरातील स्त्री शिकली पाहिजे पण पहिली स्त्री शिकणार कोण असा प्रश्न सावित्रीमाईंनी उपस्थित करताच तूच असे उत्तर देत अशिक्षित असणाऱ्या सावित्रीबाईंना महात्मा फुलेंनी शिकवलं आणि १ जानेवारी १८४८ साली भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या शाळेच्या प्रथम प्राध्यापिका म्हणून सावित्रीबाईंनी घोडदौड सांभाळली आणि खऱ्या अर्थाने महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्याला कळस चढवायच काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, ज्योतिबा व सावित्रीबाईंच्या अथक परिश्रम व त्यागामुळे स्त्री बंधनमुक्त होऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे गेली त्यामुळेच इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, पी. टी. उषा, सुनीता विल्यम्स आदी महिला देशोविदेशात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवीत आहेत. महात्मा फुलेंनी आपल्या जीवनकाळात हिंदू धर्मातील अनेक अनिष्ट चालीरीतीनां अक्षरशः सुरुंग लावला सतीप्रथा, विधवांचे केशोवपन, जुलमी सावकारी कायदे बंद पडले, विधवांचे पुनर्विवाह लावून दिले, आत्महत्या करायला निघालेल्या एका विधवेच्या मुलाला महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंनी दत्तक घेऊन त्याला यशवंत फुले ही ओळख दिली त्याला शिकवून डॉक्टर बनवलं अशी अनेक सामाजिक कार्य पार पाडत त्यांनी सामाजिक परिवर्तनाची चळवळ त्यांनी उभी केली त्यांच्या पश्चात त्यांचा वारसा सवित्रीमाईंनी व यशवंत फुले यांनी समर्थपणे पुढे नेला, महात्मा फुलेंचे कार्य हे शब्दात सांगता येईल इतके नसून ते सागराएवढे अफाट आहे परंतु जातीवादी मनुवाद्यांनी महान समाजसुधारक, महापुरुषांना जाणूनबुजून कमीपणा देत लोकांची दिशाभूल केली आहे, महाराष्ट्राच्या भूमीत अनेक महापुरुष होऊन गेले, त्यांची गुरू शिष्य परंपरा ही आहे, अण्णाभाऊंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गुरू मानलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरू मानलं, शिवाजी महाराजांनी संत तुकारामांना गुरू मानलं तर तुकारामांनी तथागत गौतम बुद्धांना गुरू मानलं ही गुरू शिष्यांची परंपरा जपण्याच आणि देशातील राष्ट्रपुरुषांना हृदयात साठवण्याच आणि त्यांचा स्वाभिमान जपण्याच कार्य कोणता समाज असेल तर तो बौद्ध समाज आहे” असे प्रतिपादन महात्मा फुलेंच्या १९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत असताना विनोद मोरे यांनी केले.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

बौद्धजन पंचायत समिती आणि संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९८ जयंती महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार (गुरुजी) यांनी अत्यंत लाघवी आणि प्रभावीपणे केले तर सरचिटणीस राजेश घाडगे यांनी प्रास्ताविक सादर करीत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपटावर प्रकाशझोत टाकत त्यांच्या कामाचा आढावा घेतला. कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, मनोहर सखाराम मोरे आदी मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास कोषाध्यक्ष नागसेन गमरे, शिवडी विभागाचे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, चिटणीस श्रीधर जाधव, विश्वस्त अनिरुद्ध जाधव, मध्यवर्ती कार्यकारिणी मंडळ, बौद्धाचार्य, महिला मंडळ, सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे