राज्यातील ‘या’ भागात अवकळीचा यलो अलर्ट जारी; वाचा सविस्तर IMD रिपोर्ट

0

मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यावर अवकाळीचं संकट घोंगावत आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसतो आहे. होळीनंतर अवकाळी पाऊस बरसत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र, मध्य विभाग आणि मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात IMD ने ‘यलो अलर्ट’  जारी केला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश आणि कर्नाटकदरम्यान कमी हवामानाचा पट्टा निर्माण झालाय. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बाष्प होत असल्याने राज्यात पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमध्ये आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पाऊस होत असल्याने उष्णतेचा पारा कमी झाला आहे. त्यामुळे उष्णतेच्या दाहातून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मागील काही दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. होळीनंतर उष्णता वाढणार असा अंदाज होता. मात्र, तसेच न होता होळीनंतर अवकाळी पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झाले त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळीच्या सरी बरसत आहेत.

राज्यातील काही भागात शुक्रवारी तर वादळी वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावली. यावेळी वाऱ्याचा वेग वाढलेला होता. अवकाळी पावसाने पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले.

अनेक भागांमध्ये गारपिट देखील मोठ्या प्रमाणात झाली असून फळ बागांचे नुकसान झाले आहे. अजूनही अवकाळीचे ढग हे राज्यात पाहायला मिळत आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. IMD ने या भागात यलो अलर्ट  जारी केला आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

मराठवाड्यात या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होताना दिसत आहेत. दुसरीकडे आज कोकणात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा हा देण्यात आला आहे. काल मुंबईच्या उपनगरांमध्ये वातावरण बदलल्याचे चित्र बघायला मिळाले. मोठ्या प्रमाणात वारे सुटले आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले.

शेतकऱ्यांना सल्ला

* पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.