वडिलांच अफेअर, दिशा सालियान केसमध्ये नवीन अँगल, थोडक्यात समजून घ्या

0

महाराष्ट्रात पाच वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियान प्रकरण चर्चेत आलं आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. हाय कोर्ट या केसवर काय भूमिका घेते? त्यावर पुढच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आता दिशा सालियान प्रकरणात वडिलांच्या अफेअरचा नवीन अँगल समोर आलाय. त्याशिवाय मालवणी पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट 24 पॉइंटमध्ये समजून घ्या.

दिशा सालियनची आत्महत्याच

आर्थिक बाबींमुळे दिशा अडचणीत होती.

वडिलांच्या अफेअरमुळे त्यांना पैसे देऊन थकली होती.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल आणि त्यांना द्याव्या लागणाऱ्या पैशांबद्दल दिशाने मित्रांना सांगितलं होतं.

दिशाचा प्रियकर रोहन राय, मित्रमैत्रिणी आणि आई-वडिलांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता.

प्रोजेक्टमध्ये झालेलं नुकसान आणि वडिलांच्या अफेअरमुळे दिशा तणावात होती.

मुंबई पोलिसांकडून 4 जून 2021 रोजी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट

डिसेंबर 2023 मध्ये पुन्हा SIT ची स्थापना. अहवाल अद्याप प्रलंबित.

8 जून 2020 रोजी मित्राच्या वाढदिवसाची पार्टी दिशाच्या फ्लॅटवर.

पार्टी सुरु असताना दिशाला लंडनमधल्या एका मित्राचा कॉल आला.

कॉल आल्यानंतर दिशा बेडरुममध्ये गेली.

काहीवेळाने सगळेजण तिच्याशी बोलायला बेडरुममध्ये गेले. पण ती टेन्शनमध्ये होती.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

दिशाला काहीवेळ एकटं सोडून सगळेजण बाहेर हॉलमध्ये आले.

काहीवेळाने दिशाने बेडरुमचा दरवाजा बंद करुन स्वत:ला आतमध्ये बंद करुन घेतलं.

बराचवेळ झाला तरी दरवाजा उघडला जात नसल्याने सर्वांनी मिळून दरवाजा उघडला.

दिशा बेडरुममध्ये सापडली नाही. ती बाथरुममध्येही नव्हती.

बेडरुमच्या बाल्कनीतून डोकावून पाहिल्यानंतर दिशा जमिनीवर पडल्याच दिसून आलं.

त्यानंतर दिशाला जवळच्या एव्हरशाइन नर्सिंग होममध्ये नेण्यात आलं.

त्यानंतर तुंगा हॉस्पिटल आणि नंतर शताब्दी रुग्णालयात नेलं.

दिशाचा मृत्यू झाला, त्यावेळी कोविड मोठ्या प्रमाणात होता.

अनेक हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केलं जात नव्हतं.

कोव्हीड चाचणीसाठी दिशाचा स्वॅब घेण्यात आला.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 11 तारखेला तिचं पोस्टमार्टम करण्यात आलं.

डोक्याला गंभीर इजा आणि शरीरावर जखमा झाल्यामुळे दिशाचा मृत्यू झाल्याच अहवालात नमूद करण्यात आलं.