सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही विजय मिळवण्यासाठी देशभर दौरे करत आहेत. निवडणुकीच्या या धामधुमीत पंतप्रधान मोदी यांनी ‘एपी ग्लोबाले’ च्या कार्यक्रमात नवी दिल्ली येथे देशातील सामाजिक, आध्यात्मिक आणि राजकीय विषयांवर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच विषयांवर भरभरून बोलले.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत घडलेल्या घडामोडींमुळे भाजपच्या राज्यातील जागा कमी होणार असल्याचा दावा विरोधक सातत्याने करत आहेत. याबाबत विचारले असता, पंतप्रधानांनी मतदार, 2014 आणि 2019 च्या निवडणुका आणि विरोधकांचा दाखला देत सडेतोड उत्तर दिले.
पंतप्रधान म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षांची जनतेसोबतची नाळ तुटली आहे. त्यांना विरोधी पक्षांची भूमिकाही व्यवस्थित पार पडता आलेली नाही. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात भाजप किती जागा जिंकणार याची विरोधकांनी चिंता करू नये. तसेत विरोधक करत असलेला हा दावाही बिनबुडाचा आहे.”
“देशात 2014 नंतर झालेल्या प्रत्येक मोठ्या निवडणुकीत देशातील जनतेने भारतीय जनात पक्षाला साथ दिली आहे. त्यामुळे भाजपच्या यशामागे जनतेचाच हात आहे. आणि याच जनतेच्या ताकदीच्या जोरावर केंद्रातही आमचे सरकार आहे. तसेच इथून पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्येही महाराष्ट्रातील जनता आमच्या मागे उभी राहत मोठ्या संख्येने ‘एनडीए’च्या उमेदवारांना विजयी करेल,” असे मोदी यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी विरोधी पक्षांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “गेल्या दहा वर्षांपासून विरोधात असलेल्या पक्षांकडे जनतेसाठी कसलाही कार्यक्रम नाही. त्यामुळे ते शहरी नक्षलवाद्यांच्या टोळ्यांसारखे झाले आहेत.” दरम्यान, महाराष्ट्रात यंदाची लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. या पाच टप्प्यांपैकी 2 टप्प्यांतील मतदान झाले असून, तिसऱ्या तप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे.
यावेळी शिवसेना उद्धव ठकारे पक्षाकडून होत असलेल्या वैयक्तीक टीकेबाबतही चर्चा झाली. त्यावर पंतप्रधानांनी ते वैय्यक्तिक टीकेला कधीही महत्त्व आणि प्रत्युत्तर देत नाहीत, असे सांगितले.
देशात असलेल्या माझ्या अनेक विरोधकांनी कायमच मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या जातीसाठी कायमच अपशब्द वापरले आहेत. तसेच त्यांनी अनेकवेळा माझ्या कुटुंबाच्या सुरुवातीच्या काळातील परिस्थितीची थट्टा केली आहे. पण या सर्व गोष्टींचा माझ्यावर कोणताही परिणाम झाला नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून होणाऱ्या टीकेवर थेट बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,” आमची या पक्षाबरोबर युती होती तेव्हाही हे लोक अत्यंत वाईट बोलत माझा अपमान करायचे. पण त्या पक्षाबरोबर आमची अनेक दशकांची युती होती. ती टिकवायची म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करायचो आणि आजही मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय.
यावेळी पंतप्रधानांनी कोणताही उल्लेख न करता शिवसेनेच्या फुटीवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, त्या पक्षाकडून माझ्यावर अनेक वर्षांपासून वैयक्तिक टीका होत आहे. हा सर्व प्रकार जनतेला आवडलेला नाही. तसेच त्या पक्षातील त्यांंचे नेते, आमदार आणि खासदारांना हे पटले नाही. म्हणून या सर्वांनी आपले राजकारण बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गावर आणले.