कायद्याच्या विरोधी भुमिका घेण्याऱ्यांचे लांगूलचालन अयोग्य संभाजीराजे छत्रपतींना तुरुंगात टाका: प्रकाश आंबेडकर

0
1

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्यावर मोक्का लावावा अशी मागणी त्यांनी केली. ‘वाघ्या’ कुत्र्याच्या समाधीचा मुद्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक वक्तव्य केले. संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी समोरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प आहे. हे शिल्प हटवण्याची मागणी केली आहे. या मागणीच्याविरोधात धनगर समाजातील काही नेत्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे वाघ्या शिल्पाचा वाद चिघळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या घडामोडींवर प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केले.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, संभाजी महाराजांना सरळ उचलून मोक्का लावावा. देशाच्या कायद्याच्या विरोधात भुमिका घेण्याऱ्यांचे लांगूलचालन करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही हिंमत दाखवावी असे आवाहन त्यांनी केले. राज्याने राज्य केले पाहिजे. धर्माचे राजकारण करताना जे सोईचे ते वापरतात. संभाजीराजे छत्रपती हे राजर्षी शाहूंचे पणतू आहेत म्हणून त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही असे नाही. उद्या मी सुद्धा कायदा विरोधी कृत्य केले तर मला ही तुरुंगात टाकले पाहिजे, असे सांगताना आता ही हिंमत देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावी, अशी मागणी त्यांनी केली.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

भाजपचे हात रक्ताने माखले, त्यांच्याकडून सौगात घेणार का?

ज्या भाजपचे हात मुसलमानांच्या रक्ताने माखले आहेत. त्यांच्याकडून सौगात ए मोदी स्विकारावा का हा विचार मौलवींनी करायला हवा, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले. हेच मौलवी निवडणुकीच्या वेळी फतवे काढतात ना? मग तुमच्या 18 टक्के समाजाला नाकारणाऱ्यांकडून भेट स्विकारावा का? असा सवालही त्यांनी केला.

देशातले अडीच लाख हिंदू हे परदेशी नागरिकत्व घेऊन बाहेर गेले आहेत. त्यात आताच्या आकडेवारीनुसार 22 टक्के हिंदूना देश सोडून परदेशात जावे वाटत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजपला आता मुसलमानांची मते हवी आहेत. त्यासाठी हे आता मुसलमानांना जवळ करू पाहत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला