2014 मध्ये शिवसेनेसोबत युती का तुटली? अखेर 10 वर्षांनी फडणवीसांनी केला गौप्यस्फोट..

0

शिवसेनेसोबत 2014 मध्ये युती का तुटली? अखेर 10 वर्षांनी फडणवीसांनी केला गौप्यस्फोट…शिवसेना-भाजपची ही युती का तुटली, याची इनसाइड स्टोरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत राजकीय गौप्यस्फोट केला. चार जागांवरून युती तुटली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले.

मुंबईत राजस्थान ग्लोबल फोरमच्यावतीने सिक्कीमचे राज्यपाल ओम माथुर यांचा सत्कार सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात 2014च्या विधानसभा निवडणुकीचा घटनाक्रम सांगितला. ओम माथुर यांच्याकडे भाजपकडून महाराष्ट्राची जबाबदारी होती. युती राहिली असती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. पण, युती तुटली आणि भाजपचा मुख्यमंत्री झाला असल्याच्या आशयाचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेना 147 आणि भाजप 127 जागांवर निवडणूक लढवणार भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव होता. मात्र, शिवसेना 151 जागांवर अडून बसले. जागा वाटपावरून शिवसेनेसोबत चर्चा सुरू होती. आम्ही त्यांना जास्त जागा द्यायला सुद्धा तयार होतो. मात्र त्यांनी आपल्या मनात 151 चा आकडा पकडला होता असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

अन् युती तुटली….

फडणवीस यांनी पुढे म्हटले की, त्यावेळी ओमप्रकाश माथूर हे महाराष्ट्र प्रभारी होते यांनी अमित शहा यांच्या सोबत बोलणं केलं. त्यावेळी अशा प्रकारे अशाप्रकारे चालणार नाही, अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बोलणं केलं. त्यानंतर ठरलं की आम्ही 127 आणि ते 147 असा फॉर्म्युला ठरला तर होईल, नाहीतर युती राहणार नाही.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

अमित शाह आणि ओम माथूर आत्मविश्वास होता की पक्ष अधिक जागांवर विजयी होऊ. या विश्वासाच्या जोरावर आम्ही शिवसेनेला अल्टीमेटम दिलं आणि सांगितलं की 147 वर तुम्ही लढणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही 127 लढू. युती 200 हून अधिक जागांवर विजयी होईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री होईल असे सांगण्यात आले.