महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘ कोथरूड शिवजयंती महोत्सव २०२५’ ला उत्साही प्रतिसाद; आज मोठ्या पडद्यावर ‘छावा’ चित्रपटा चे आयोजन

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सचिन फ्रेंड्स सर्कल कुंदन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड शिवजयंती महोत्सव २०२५चे आयोजन करण्यात आले. दिनांक १६ मार्च रोजी मनसे शाखा वनाझ कॉर्नर येथे दुर्मिळ शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे प्रदर्शन पाहण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघामधील शेकडो पालक आपल्या लहान मुलांसोबत उपस्थित होते.

दिनांक १७ मार्च रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटाचे प्रक्षेपण केलं जाणार आहे. तरी कोथरूडवासियांनी तमाम शिवभक्तांनी छावा चित्रपट पाहण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मनसेचे सरचिटणीस आणि कोथरूड शिवजयंती महोत्सवाचे संस्थापक ॲड. किशोर शिंदे यांच्यासह रवी वाल्हेकर, नवनाथ दळवी, प्रतीक कंधारे, अमोल खराडे, विश्वास किरमिटे यांनी केले.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?