भाजपकडून विधान परिषदेसाठी 3 उमेदवारांची नावे जाहीर; यांची लॉटरी लागली तर यांच्या वाटेला वाटण्याच्या अक्षदा?

0
1

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यात भाजप सर्वाधिक 3 जागा लढवणार आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात विधानपरिषद राज्यसभा अशा जागा जाहीर होण्याची वेळ आल्यानंतर कायमच पहिल्या स्थानी चर्चेत असलेल्या ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्या नावाला यावेळीही केंद्रीय नेतृत्वाकडून वाटण्याची अक्षदा लावण्यात आले असून धक्कादायकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर मध्ये काम पाहणाऱ्या संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे.

दिल्लीतील केंद्र नेतृत्वाने जाहीर केलेल्या या संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यां यांच्या नियुक्ती मागे विशेष कारणे असल्यानेच ही उमेदवारी जाहीर झाली आहे. सोमवार उद्या अर्ज दाखल करायचा आहे. नागपूर विभागामध्ये सक्रिय पक्षाचे काम करण्या साठी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदीप जोशी यांच्यावर जबाबदारी दिली तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे या विभागांमध्ये सक्रिय आणि संघटनात्मक काम करण्यामध्ये संदीप जोशी यांनी मोलाचे योगदान दिले आहे.सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्यांना संधी मिळेल अशी चर्चा सुरू झाल्या असतानाच थेट देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली वारी करत आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला आहे अशी ही चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

पक्ष संघटनेमध्ये केलेल्या कामाचे मोल म्हणून संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरमधून येतात. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मराठवाडा हा सर्वात कठीण अशी समज झालेली असताना लोकसभेमध्ये ही दारुण पराभव या भागातील पक्षातील नेत्यांना भोगाव लागला त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान (मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वात तीव्र भावना असलेल्या) त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम काम केलेलं आहे. मराठवाड्याच्या भागांमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी संजय केनेकर यांनी घेतलेल्या श्रमामुळे मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाने समाधानकारक कामगिरी केली.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

वर्धा जिल्ह्यातील महायुतीचे सत्ता कारण जुळवताना दादाराव केचे यांना विधानसभेच्यावेळी तिकीट नाकारण्यात आलं होतं. म्हणून त्यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी एक जागा लढवणार आहे.