धगधगत्या आयुष्यात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. सध्या अनेक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशातच आता कोल्हापुरातून धक्कादायक महिती समोर आली आहे. गाडी चालवताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने माजी आमदाराच्या पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल.






माजी आमदाराच्या पुतण्याचा मृत्यू
काँग्रेसचे माजी आमदार पी एन पाटील यांच्या पुतण्याचा जागीच मृत्यू झाल्याची समोर आलं आहे. गाडी चालवत असताना धीरज पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचा गाडीवरचा कंट्रोल सुटला. गाडीचे नियंत्रण सुटून अपघात झाला आहे. टेबलाई उड्डाण पूलाजवळ हा अपघात घडल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
https://x.com/News18lokmat/status/1900818842181382443?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1900818842181382443%7Ctwgr%5Ecc0ea49fa087e9533d29a37011769ee869942c6a%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnews18marathi.com%2Fmaharashtra%2Fformer-mla-pn-patil-nephew-dheeraj-patil-dies-suffering-a-heart-attack-while-driving-shocking-cctv-video-1356746.html
गाडीचं नियंत्रण सुटलं अन्…
समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओनुसार ही घटना रात्री आठच्या सुमारास घडल्याची माहिती मिळतीये. धीरज पाटील कारने प्रवास करत असताना वाटेत त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. काहीतरी होतंय असं जाणवल्यावर त्यांच्या गाडीचं नियंत्रण सुटलं. तर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. गाडी फ्लायओव्हरवर न घातला त्यांनी गाडी वळवली मात्र गाडीचा स्पीड इतका होता की, धीरज पाटील यांना काहीही सुधारलं नाही.
हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
दरम्यान, गाडीने पुढे जाऊन दुचाकी आणि दुकानांना धडक दिल्यानंतर गाडी जागेवरच थांबली. गाडीचा अपघात झाल्यानंतर धीरज पाटील यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना बाहेर काढलं अन् दवाखान्यात नेलं. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, अशी प्राथमिक माहिती आहे.










