महायुती सन्मवय समिती रात्री उशिरा बैठक; विधिमंडळ समितीचा ‘फॉर्म्युला’ ठरला, पण महामंडळ रस्सीखेच सुरूच

0

महायुती सन्मवय समिती रात्री उशिरा बैठक; विधिमंडळ समितीचा ‘फॉर्म्युला’ ठरला, पण महामंडळ रस्सीखेच सुरूच

३ मार्चपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशला सुरुवात झाली. आजचा अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आधीचे दोन दिवस वादळी ठरले. विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
विधानसभेचे कामकाज सुरू होण्याअगोदरच विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर अखेर धनंजय मुंडेंना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर त्याच दिवशी रात्री उशिरा महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला ठरला आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

त्यानुसार भाजपला ११, शिवसेनेला ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४ असा फॉर्म्युला असल्याचे समजते. तर उर्वरित सात समितींबाबत निर्णय बाकी होता. या जागा अपक्षांसाठी ठेवल्याची माहिती आहे. यातील ११ महत्त्वाच्या समित्यांवर भाजप आमदारांची वर्णी लागली आहे. या बैठकीला भाजपकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे हे नेते बैठकीसाठी उपस्थित होते.

या समित्यांमध्ये लोकलेखा समिती, आहार व्यवस्था समिती, धर्मदाय समिती, अनुसूचित समिती, विशेष हक्क समिती, मानव हक्क समिती तसेच आश्वासन या समित्यांमधून मंत्रीपद हुकलेल्या आमदारांचे पुनवर्सन केले जाणार आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा