पुण्याच्या स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पुण्यातील या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. तरुणीवर अत्याचार प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या प्रकरणातील पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे. मेडिकल रिपोर्ट पोलिसांना देण्यात आला आहे. या मेडिकल रिपोर्टकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.






पुण्यातील स्वारगेटमधील डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. अत्याचाराची घटना घडल्यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर काही वेळेनंतर मेडिकल रिपोर्टसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर आता पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे.
मेडिकल रिपोर्ट पोलिसांना देण्यात आला आहे. ससून रुग्णालयाने पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना सुपूर्द केला आहे. मेडिकल रिपोर्टमधून अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहे. पोलिसांना तपासात मेडिकल रिपोर्टची मदत होणार आहे. या मेडिकल रिपोर्टमुळे कोण-कोणते खुलासे होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.











