केंद्रीय मंत्री मोहोळांच्या कोथरूडमध्ये पुन्हा कोयते रक्ताने माखले, मध्यरात्री 10 जणांकडून बदला, तरुण जागीच मृत

0
1

मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगच्या दहशतीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करत कोयता गँगला चाप बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोयता हल्ल्याची घटना सुरूच आहेत. रविवारी मध्यरात्री पुन्हा एकदा कोयता हल्ल्याने पुणे हादरलं आहे. पुण्यातील कोथरुड परिसरात रविवारी मध्यरात्री दहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयता आणि तलवारीने सपासप वार केले आहेत.

हा हल्ला इतका भयंकर होता की संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील प्राईम लोकेशन असलेल्या कोथरुड भागात खूनाची ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दिनेश भालेराव (वय २७), सोहेल सय्यद (वय २४), राकेश सावंत (वय २४), साहिल वाकडे (वय २५) बंड्या नागटिळक (वय १८), लखन शिरोळे (वय २७) अनिकेत उमाप अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

तर गौरव अविनाश थोरात असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. रविवारी मध्यरात्री तो कोथरुडच्या शास्त्रीनगर भागात होता. यावेळी घटनास्थळी आलेल्या दहा जणांनी धारदार कोयते आणि तलवारीने गौरववर हल्ला केला. काही कळायच्या आत हा हल्ला झाल्याने गौरव स्वत:ला वाचवू शकला नाही. या हल्ल्यात तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. ज्यात त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना स्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मयत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मयत आणि हल्लेखोरांमध्ये नेमका वाद काय होता? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाहीये. पोलीस हत्येचा कारणाचा आणि आरोपींचा शोध घेत आहेत. पण मध्यरात्री अशाप्रकारे टोळक्याने तरुणाची हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!