भारत पाकिस्तान सामना म्हटलं की सर्वत्र एकच चर्चा आणि तो माहोल हे अंगवळणी पडलेले असतानाच आज चॅम्पियन ट्रॉफी च्या निमित्ताने हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी दुबईतील मैदानात भिडत असताना सुरुवातीलाच दोन फलंदाज बाद करत भारतीय गोलंदाजांनी आपली पकड सामन्यावरती घट्ट रोवून ठेवली. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या विकेटसाठी पाकिस्तान संघातील दोन अनुभवी खेळाडू झगडत संघाला सावरण्याचे काम केलं परंतु अचानक भारतीय संघाच्या गोलंदाजांना लय मिळाला आणि जनार्दन पत्त्याचा बंगला कोसळावा तशी पाकिस्तानची फलंदाजांची फळी कोसळत गेली. भारत-पाकिस्तान सामन्यात तगडी लढत होण्याची शक्यता लक्षात घेता 240 चा आव्हान भारतासाठी तितकसं मोठं नाही. पाकिस्तान संघाचा कर्णधार रिझवान आणि शकील यांनी पाकिस्तानसाठी चांगले धावा जमा करण्याचं मोठं काम केलं असलं तरी शेवटी अन्य फलंदाजांनी योग्य साथ न दिल्याने पाकिस्तानला समाधानकारक आव्हान देणे अवघड झाले आहे.
भारतीय संघाचा विचार करता सलामीवीर शुभमन गील रोहित शर्मा विराट कोहली यांच्यासह दुसऱ्या फळीतील हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा के एल राहुल अक्षर पटेल अशी तगडी फलंदाजाची फळे लक्षात घेता काही क्षणांमध्ये भारतीय संघ पाकिस्तानला दारूण पराभव देऊ शकतो. ज्या उत्सुकतेने भारतीय क्रीडा रसिक या सामन्याचे आतुरतेने वाट पाहत होती त्या तुलनेत पाकिस्तान संघाची अडखळत झालेली सुरुवात कदाचित क्रीडाप्रेमींचे निराशा करणारे आहे. भारताचे सलामीचे फलंदाज आणि त्यांचा सध्याचा फॉर्म लक्षात घेता भारतासाठी हे आव्हान पार करणे म्हणावे तसे अवघड नाही.
पाकिस्तानच्या रिझवान-शकील जोडीने भारताला सतावलं, हार्षित राणाने केली चूक; हार्दिक भडकला
भारताने पाकिस्तानच्या धावगतीला काही अंशी खिळ लावली होती. पाकिस्तानच्या दोन विकेट स्वस्तात बाद झाल्या. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला होता. पण तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सउद शकील यांनी सावध खेळी केली. धावांची गती भले कमी होती. पण पाकिस्तानने खेळ लांबवण्यात यश मिळवलं. रिझवान आणि सउद शकीलने तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. मोहम्मद रिझवानने या भागीदारीत 46 धावांचं योगदान दिलं. तर सउद शकीलने अर्धशतकी खेळी केली. एक क्षण असा आला की ही जोडी फोडली नाही तर टीम इंडियाचं टेन्शन वाढू शकतं. त्यामुळे रोहित शर्माने 33 वं षटक हार्दिक पांड्याच्या हाती सोपवलं. पण या षटकात हार्षित राणाने चूक केली.
मोहम्मद रिझवान आणि सउद शकील ही जोडी फोडण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरु होता. दुसरीकडे, धावगती वाढवण्यासाठी मोहम्मद रिझवानने संधी घेण्याचा निर्णय केला. हार्दिक पांड्याच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानने उत्तुंग फटका मारला. हा चेंडू इतका वर चढला की सहज झेल असं वाटलं. या चेंडूखाली हार्षित राणा पोहोचलाही. पण झेल काही पकडू शकला नाही. यामुळे हार्दिक पांड्या चांगलाच संतापला. तसेच दोन धावा फुटकच्या आल्या.
रिझवान आणि शकील जोडी शेवटच्या षटकात तोडफोड करतील अशी धास्ती क्रीडाप्रेमींना वाटत होती. पण अक्षर पटेलने ही भीती दूर केली. 34 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला क्लिन बोल्ड केलं. यामुळे हार्षित राणाचा जीव भांड्यात पडला. कारण मोहम्मद रिझवानने आक्रमक खेळी करत धावा केल्या असत्या तर हार्षित राणावर सर्वच स्तरावरून टीकेचा भडिमार झाला असता.
अक्षर पटेलचा डायरेक्ट थ्रो! डोळ्याची पापणी लवण्याच्या आत इमामचा ‘करेक्ट कार्यक्रम’
भारताविरुद्ध दुबईच्या मैदानात रंगलेल्या हायहोल्टेज सामन्यात पाकिस्तानच्या संघाच्या सलामी जोडीनं संयमी सुरुवात केली. इमाम उल हक आणि बाबर आझम ही जोडी सेट झालीये असं वाटत असताना हार्दिक पांड्यानं पाकला पहिला धक्का दिला.बाबर आझमची विकेट घेत पांड्यानं सलामी जोडी फोडली. धावफलकावर ४१ धावा असताना पाकिस्तानच्या संघाला हा पहिला धक्का बसला. त्यानंतर फखर झमानच्या जागी संघात स्थान मिळालेल्या सलामीवीर इमाम उल हक याने मोठी चूक केली अन् आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. अक्षर पटेलनं क्षेत्ररक्षणाचा अद्भूत नजराणा पेश करत भारतीय संघाला त्याच्या रुपात दुसरी विकेट मिळवून दिली.
अक्षर पटेलची चपळाई, इमान उल हकचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’बाबर आझमची विकेट घेत पांड्यानं सलामी जोडी फोडली. धावफलकावर ४१ धावा असताना पाकिस्तानच्या संघाला हा पहिला धक्का बसला. त्यानंतर फखर झमानच्या जागी संघात स्थान मिळालेल्या सलामीवीर इमाम उल हक याने मोठी चूक केली अन् आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. अक्षर पटेलनं क्षेत्ररक्षणाचा अद्भूत नजराणा पेश करत भारतीय संघाला त्याच्या रुपात दुसरी विकेट मिळवून दिली.
अक्षर पटेलची चपळाई, इमान उल हकचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’बाबर आउट झाल्यावर एकेरी धाव घेण्याच्या नादात इमाम उल हकनं आपली विकेट गमावली. अक्षर पटेलनं डायरेक्ट थ्रो करत पाकिस्तानच्या दुसऱ्या सलामीवीराचा खेळ खल्लास केला. अक्षर पटेल हा एक ऑल राउंडर खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंगसह फिल्डिंगमध्ये तो कमालीच्या कामगिरीनं लक्षवेधून घेताना पाहायला मिळते. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याचा फिल्डिंगमधील तोरा अगदी पुन्हा पुन्हा पाहण्याजोगा होता. पाकिस्तानी खेळाडूच्या कुलदीप यावदच्या गोलंदाजीवर डायरेक्ट स्टंप टिपत त्याने इमामचा करेक्ट कार्यक्रम केला.
दहाव्या षटकात अक्षर पटेलनं साधला डाव, पाकला बसला दुसरा धक्का
अक्षर पटेल पाकिस्तानच्या डावातील दहव्या षटकात आपल्या क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम दर्जा दाखवून दिला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर इमामनं पुढे येऊन मिड ऑनच्या दिशेनं फटका खेळला. त्यानंतर त्याने लगेच एकेरी धाव घेण्यासाठी मैदान सोडले. पण बापू अर्थात अक्षर पटेल एकदम वेगाने चेंडूवर आला अन् त्याने स्टंपवर अचूक निशाणा साधत पाकिस्तानच्या संघाला दुसरा धक्का देत भारतीय संघाला मोठा दिलासा दिला. इमाम उल हक २६ चेंडूचा सामना करून अवघ्या १० धावांवर बाद झाला. त्याला एकही चौकार किंवा षटकार मारता आला नाही.