महाराष्ट्रात ‘छावा’ची हवा अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधी कमावले दिवशी 14063 शो; 25 कोटी जमा होण्याची शक्यता

0

अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षीत छावा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली. माहितीनुसार सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधीची कमाई झाली आहे. या चित्रपटाचा पहिलाच दिवस खास ठरणार आहे, कारण या चित्रपटाचे हजारो तिकीट अ‍ॅडव्हान्समध्ये बुक झालेले आहेत.

‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सगळ्यांना चित्रपट प्रदर्शनाची उत्सुकता लागली होती. चित्रपटाच्या प्री-बुक केलेल्या तिकिटांच्या विक्रीतून अंदाजे 14 कोटी रुपये मिळण्याची माहिती आहे. देशभरातून या चित्रपटाचे 14 हजार 63 हून अधिक शो असणार आहे. या शोचं अडव्हान्स बुकिंग जवळपास 5 लाख तिकिटांची विक्री अडव्हान्स केली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

अ‍ॅडव्हान्स बुकिंमध्ये 13 कोटींची कमाई केली आहे. तर ब्लॉक सीट्ससह जवळपास 18 कोटी रुपयांचा गल्ला जमा झाला आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपटात 23 – 25 कोटी रुपयांची कमाईने सुरुवात करण्याची शक्यता आहे.

चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत आहे. अक्षय खन्ना या चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरुन तरी हा चित्रपटाला चांगली पसंती दिसून येत आहे.