‘छावा’तील या डायलॉग्समध्ये बदल, काही सीन्सवर सेन्सॉरची कात्री ‘आमीन’च्या जागी; ‘युए 16+’ रेटिंग

0

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटातील लेझीम नृत्याच्या दृश्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर ते दृश्य हटवण्याचा निर्णय टीमकडून घेण्यात आला. लेझीम नृत्यकला जगभरात पोहोचावी, केवळ या उद्देशाने ते दृश्य चित्रपटात समाविष्ट केल्याचं दिग्दर्शक, अभिनेत्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर आता चित्रपटातील इतरही काही दृश्ये आणि संवादांवर कात्री चालवण्यात येणार आहे. येत्या 14 फेब्रुवारीला ‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने त्यातील काही दृश्यांमध्ये आणि संवादांमध्ये बदल सुचवले आहेत.

मराठा योद्धांनी साडी नेसल्याचं दृश्य चित्रपटातून काढून टाकण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत. त्याचप्रमाणे ज्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे, त्याचं नाव सांगणारा डिस्क्लेमर समाविष्ट करण्यास सांगितलं आहे. याव्यतिरिक्त डिस्क्लेमरमध्ये हेसुद्धा स्पष्ट करण्याची सूचना दिली आहे की, या चित्रपटाचा हेतू कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीची बदनामी करण्याचा किंवा तथ्ये चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा नाही.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

‘छावा’ या चित्रपटातील ‘हरा*****’ शब्दाला म्यूट करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही डायलॉग्समध्येही बदल सुचविण्यात आले आहेत. ‘मुघल सल्तनत का जहर’ या डायलॉगला बदलून ‘उस समय, कई शासक और सल्तनत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थें’ असं करण्यात आलं आहे.

‘खून तो आखिर मुघलों का ही है’ हा संवाद बदलून ‘खून तो है औरंग का ही’ असं केलंय. चित्रपटातील एका सीनमध्ये ‘आमीन’ या शब्दाऐवजी ‘जय भवानी’ हा शब्द वापरण्यास सांगितलं आहे. प्रेक्षकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन हे बदल सुचविण्यात आले आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

’16 वर्षे’ बदलून ’14 वर्षे’ असं केलंय

’22 साल का लडका’ बदलून ’24 साल का लडका’ असं केलंय

‘9 साल’ बदलून ‘कई साल’ असं केलंय

‘छावा’ला सेन्सॉर बोर्डाने ‘युए 16+’ची रेटिंग दिली आहे.

या चित्रपटाचा रनटाइम 161 मिनिटं आणि 50 सेकंद म्हणजेच जवळपास 2 तास 42 मिनिटं इतका आहे. ऐतिहासिक कथानकावर आधारित या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई भोसले आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी इतिहासकार, इतिहासतज्ज्ञांनाही दाखवणार असल्याचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केलं होतं.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा