राहुल सोलापूरकरांचे आणखी एक वाद्‌ग्रस्त विधान व्हायरल; बाबासाहेबांना दत्तक घेतलं वेदानुसार ते ब्राम्हणच; अनुयायी आक्रमक!

0

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर संबंध महाराष्ट्रात असंतोष पाहायला मिळाला. राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत असतानाच सोलापूरकर यांचं आणखी एक वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यानंतर आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून सोलापूरकर यांनी आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी; अन्यथा त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

https://www.facebook.com/share/r/1EFwo46GLX/

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राच्या सुटकेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर संबंध महाराष्ट्रातून राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यात आला. काही संघटनांनी आक्रमक होत थेट सोलापूरकर यांच्या घरावर चाल केली. त्यानंतर सोलापूरकरांनी त्याबाबत माफी मागितली आहे. मात्र, सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, या मागणीवर शिवप्रेमी ठाम आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वाद्‌ग्रस्त विधान करणारे राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण ठरतात, असं विधान केलं आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन खरात म्हणाले, मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात, असे अत्यंत निषेधार्ह विधान केलं आहे. पण, राहुल सोलापूरकर यांना मी सांगू इच्छितो की, जे वेद आहेत, त्याच्याबद्दल डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले आहे आणि डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला राहुल सोलापूरकर यांनी काहीही शिकवू नये.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

राज्य सरकारने राहुल सोलापूरकर यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही सचिन खरात यांनी दिला आहे.