राज्य सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. या पडताळणीत आतापर्यंत ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे या अपात्र महिलांचे पुढं काय होणार?या महिलांवर कारवाई होणार? की या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार? याची चर्चा महिलांसमध्ये सुरु आहे. दरम्यान, यासंदर्भात आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.






https://x.com/iAditiTatkare/status/1887868997875470704?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1887868997875470704%7Ctwgr%5E9b34d0e87c50d789599c805fda790a6e4e23639c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
आदिती तटकरे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
पुढे बोलताना, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.











