धक्कादायक! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार, पुणे हादरले

0
6

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे, शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. २६ वर्षीय तरूणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये अभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने महिलेवर बलात्कार केला अन् पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाच वाजता ही धक्कादायक घटना घडली. पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार कऱण्यात आली आहे. पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात येत आहेत.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

पुण्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्टँडवर उभ्या असणाऱ्या शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. महिला एकटीच असल्याचा फायदा घेत नराधमाने महिलेवर बलात्कार केला, त्यानंतर तेथून पळ काढला. या प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

26 वर्षाची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली होती. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फलटणला जाणारी एसटी बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं. माझी एसटी याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने त्याला सांगितलं. मात्र एकट्या मुलीचा फायदा घेत त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दात अडकवले.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती. या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर तिने ही एसटी तर बंद आहे असं देखील सांगितलं. तू टॉर्च लावून आत मध्ये जा हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल, असं या नराधमाने तिला सांगितले आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला. त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला. घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितलेला असून पोलिसांची विविध पथकाकडून आरोपीचा शोध घेतला जातोय.