रात्री 12 च्या ठोक्याला इन्कम टॅक्सचे अधिकारी संजीवराजे यांच्या बंगल्यातून पडले बाहेर

0
20

इन्कम टॅक्स विभागाने काल संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापे टाकले. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा, मुंबई आणि पुण्याच्या घरावर ही छापेमारीची कारवाई करण्यात आली. संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा फलटणमधील वजनदार नेते आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. संजीवराजे नाईक निंबाळकर हे सध्या शरद पवार यांच्या पक्षात आहेत.

लवकरच ते पुन्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच बोललं जातय. त्याआधी ही छापेमारीची कारवाई झाली. संजीवराजे नाईक निंबाळकर आधी अजित पवार यांच्यासोबतच होते. पण विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. आता ते पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्या मार्गावर आहेत.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन

सातारा फलटण येथे काल आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची तब्बल 17 तास चौकशी करण्यात आली. रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी बंगल्यातून बाहेर पडले. चौकशीनंतर संजीवराजे यांनी घराबाहेर येऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. संजीवराजे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देण्याचं टाळलं. संजीवराजे यांच्या निवासस्थानी अजूनही पोलिसांचा बंदोबस्त आहे. काल सकाळी 6 वाजल्यापासून इन्कम टॅक्स विभागाकडून ही छापेमारीची कारवाई सुरु होती.

‘हे दोन नंबरचे घर नाही’

“काळजीचे काहीही कारण नाही. महाराष्ट्रात काही क्लिअर कुटुंब आहेत. लोकांनी आश्वस्त राहावं. यामध्ये काही निष्पन्न होणार नाही. हाच वेळ इतर लोकांसाठी दिला तर बरे होईल. कोणतीही चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचे हिशोब उत्तर या ठिकाणी आहे. जुनी घरे आहेत या अशा पद्धतीने टार्गेट करणे योग्य नाही. हा प्रक्रियेचा भाग आहे. झाले ते योग्य झाले. साप साप म्हणून भुई थोपटत होते ते बंद झाले. चौकशीसाठी आलेले लोक सुद्धा रिस्पेक्ट फुल आहेत. त्यांच्यासमोरही लक्षात आले आहे हे दोन नंबरचे घर नाही. संजिवराजे यांच्या जवळ प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे” असं रघुनाथ राजे नाईक निंबाळकर म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!