वाल्मीकचा हात पाहणाऱ्या ‘त्या’ (कॅप्टन)ज्योतिषाकडे मंत्री नतमस्तक! त्या गावासाठी 2 कोटीचा शासकीय निधीतून रस्ताही दान?

0
1

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी बीडचे वादग्रस्त आणि खंडणी प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड यांच्याबाबत मोठा खुलासा केला होता. वाल्मीक कराडने फरार असताना नाशिकच्या ज्योतिषाकडे हात दाखवला होता, असा आरोप करण्यात येत आहे. या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. नाशिकचा तो ज्योतिषी कोण? याविषयी सगळ्यांनाच मोठी उत्सुकता लागली आहे. तो हस्तरेषा तज्ञ म्हणजे नाशिक शहरात ऑफिस टाकलेला ज्योतिषी असल्याचे पुढे येत आहे. तो ‘कॅप्टन’ या टोपण नावाने प्रसिद्ध असल्याचे बोलले जाते.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आरोप केल्यानंतर वाल्मीक कराड बाबत एक नवी चर्चा सुरू झाली आहे. त्या चर्चेला संबंधित हस्तरेषा तज्ञ व त्याचे नाव पुढे आले आहे. हा वादग्रस्त हस्तरेषा तज्ञ महायुती सरकारमधील अनेक राजकीय नेत्यांचा स्वयंघोषित गुरु असल्याची देखील चर्चा आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षातून बंडखोरी केल्यावर मंत्री झालेले एक नेते नियमितपणे या वादग्रस्त तज्ञाकडे येतात. गंमत म्हणजे हा सल्ला घेऊनही ते नेते सध्या मात्र मंत्रीपदापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सध्या ते सातत्याने वादग्रस्त विधाने करतांना दिसतात.

कोकणातील हे माजी मंत्री या हस्तरेषा तज्ञाच्या चांगलेच आहारी गेले आहेत. या हस्तरेषा तज्ञाने सिन्नर शिर्डी रस्त्यावर आपल्या गावी एक मंदिर बांधले आहे. त्यातही जादूटोणा आणि मंत्र तंत्र यावर त्याचा भर असल्याची चर्चा आहे. या मंदिराला राज्य मंत्रिमंडळातील शिवसेना शिंदे पक्षाचे हे नेते मंत्री असताना नियमित भेट देत होते.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

ते दिवसभर या तांत्रिका सोबत वेळ घालवत असत. मुख्य रस्त्यापासून हे मंदिर आत असल्याने जाण्या येण्याचा त्रास होऊ नये म्हणून, चक्क त्या गावासाठी दोन कोटी रुपयांच्या शासकीय निधीतून रस्ताही करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री देखील या ज्योतिषाकडे यायचे. अहिल्या नगर जिल्ह्यातील एक साखर कारखानदार आणि सध्या व मागच्या मंत्रिमंडळातही वजनदार मंत्री असलेले एक मंत्री देखील या तांत्रिकाचे शिष्य असल्याचे बोलले जाते.

तृप्ती देसाई यांनी वाल्मीक कराड नाशिकला असताना हस्तरेषा तज्ञाकडे गेले होते, अशी माहिती दिल्यानंतर नाशिक मध्ये याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. तो मांत्रिक कोण? हे आता प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याच्या ओठावर येऊ लागले आहे. प्रत्येक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तोच चर्चेचा विषय बनला आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार