भारताचा इंग्लंडवर 150 धावांनी दणदणीत विजय; फिलिप सॉल्टचे अर्धशतक व्यर्थ

0

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी- 20 सामन्यात अभिषेक शर्माचा झंझावात पाहायला मिळाला. त्याने 37 चेंडूत शतक ठोकत इंग्लंडच्या गोलंदाजाची पिसे काढली. एका बाजूने धडाधड विकेट पडत असताना अभिषेक शर्माचा झंझावात सुरु होता. या सामन्यात भारताने इंग्लंडवर 150 धावांनी विजय मिळवला आहे. 248 धावांचा पाठलाग करताना इंग्लडच्या संपूर्ण संघाला अवघ्या 97 धावा करता आल्या. या विजयासह भारताने 4-1 ने ही मालिका जिंकली आहे.

भारताने या सामन्यात पॉवर प्लेमध्ये 95 धावा करत रेकॉर्ड नोंदवला आहे. तसेच भारताने 6.3 षटकात म्हणजेच 39 चेंडूत शतक ठोकलं. तर अभिषेक शर्माने 37 चेंडूत शतक ठोकत वेगवान शतकांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अभिषेक शर्मा 54 चेंडूत 13 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 135 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 250 चा होता.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

अभिषेक शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 247 धावा केल्या आणि विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिले होते. संजू सॅमसन 7 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माने 15 चेंडूत 24 धावा केल्या. सूर्यकुमार यादव या सामन्यातही फेल गेला. त्याला फक्त 2 धावाच करता आल्या. पण शिवम दुबेने 13 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या माध्यमातून 30 धावा केल्या. हार्दिक पटेल आणि रिंकु सिंह प्रत्येकी 9 धावांवर बाद झाले.

या सामन्यात इंग्लडचा सलामीवीर फिलिप सॉल्ट याने जोरदार प्रतिकार केला मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. फिलिप सॉल्ट आणि जेकब बेथेल सोडले तर इंग्लंडच्या कोणत्याच खेळाडूला दुहेरी धावसंख्या करता आलेली नाही. या सामन्यात भारताकडून वरुण चक्रवर्तीने 2, अभिषेक शर्माने 2, शिवम दुबेने 2, मोहम्मद शामीने 3 तर रवी बिष्णोईने 1 विकेट घेतली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता