तिप्पट मोबदल्याच्या आमिषाने गंडा; बावधनमधील बांधकाम व्यावसायिकाची दोन कोटींची फसवणूक

0
1

कंपनीत गुंतवणूक केल्यास तिप्पट मोबदला देतो, असे सांगून तरुणास दोन कोटी एक हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, कोणताही मोबदला न देता त्याची फसवणूक केली. मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे व बावधन येथे जानेवारी ते नाेव्हेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी मुळशी तालुक्यातील बावधन बुद्रुक येथील ३७ वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी (दि. ३१ जानेवारी) फिर्याद दिली. अनिष आचार्च, मनिष कुमार अगरवाल, पराग गर्ग, मुकुल जैन यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भादंवि कलम ४२०, ४०६, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबधाचे रक्षण करणेबाबत अधिनियम १९९९ चे कलम ३, ४ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा बांधकाम व शेती व्यवसाय आहे. संशयितांनी त्यांच्या प्रिविन प्रेपरेटिव्ह प्रा. लि. (पत्ता ए ६१, तिसरा मजला, सेक्टर ६५, नोएडा, गौतम बुद्ध नगर, उत्तरप्रदेश) या कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. दुप्पट-तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यातून वेळोवेळी रोख, आरटीजीएस व आयएमपीएसव्दारे दोन कोटी एक हजार रुपये ठेव स्वरुपात घेऊन त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासाठी तिप्पट मोबदला देतो, असे सांगितले. मात्र, फिर्यादीला कोणत्याही प्रकारचा परतावा किंवा गुंतवलेली रक्कम परत न देता विश्वासघात करून फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक सागर ठाकरे तपास करीत आहेत.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार