बाबा सिद्दीकी हत्येत धक्कादायक खुलासा: ठाकरे गट आणि या भाजप नेत्याचं नाव; शपथ घ्यायच्या 2 दिवस आधी हत्या

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. आरोपींनी एका बाजूला हत्या करण्यामागच कारण सांगितलं आहे, त्याचवेळी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकीने मुंबई पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये एका डायरीचा खुलासा केला आहे. यात बिल्डर आणि नेत्यांची नाव आहेत. झिशानने आपल्या स्टेटमेंटमध्ये बिश्नोई गँगचा उल्लेख केलेला नाही. पोलिसांनी 4500 पानी आरोपपत्र दाखल केलय. यात 26 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय. अनमोल बिश्नोईला फरार आरोपी ठरवलं आहे. झिशान सिद्दीकी यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांची नाव घेतली आहेत.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

या हत्या प्रकरणात SRA अँगलने तपास व्हावा, असा झिशान सिद्दीकी यांचा प्रयत्न आहे. त्यांनी काही मोठे बिल्डर आणि विकासकांची नाव घेतली आहेत. अनिल परब हे एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते. बाबा सिद्दीकी हे डायरी लिहायचे. हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान व्हॉट्स ॲपवरुन त्यांचं मोहित कंबोज यांच्याशी बोलणं झालं होतं. एका बिल्डरच्या पाठपुराव्यासाठी मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकी यांना भेटायचं होतं.

विधान परिषदेवर शपथ घ्यायच्या दोन दिवस आधी हत्या

झिशान सिद्दीकी यांचं चार पानी स्टेटमेंट आहे. त्यात त्यांनी ज्या-ज्या बिल्डरांची नाव घेतली आहेत, त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी तपास करावा असं म्हटलं आहे. माझे वडिल दोन दिवसांनी विधान परिषदेवर शपथ घेणार होते. पण त्याआधीच 12 ऑक्टोबरला त्यांची गोळी मारुन हत्या झाली, असं झिशानने सांगितलं. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर 15 ऑक्टोबर 2024 विधान परिषदेसाठी नामांकित केलेल्या नेत्यांनी शपथ घेतली. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासावर आपण समाधानी नाही हे आधीच झिशान यांनी स्पष्ट केलं होतं. आज या प्रकरणात काय आरोप-प्रत्यारोप होतात. झिशान स्वत: काय बोलणार? त्यावरुन मोठे राजकीय फटाके फुटू शकतात.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

झिशान सिद्दीकीने बिश्नोई गँगच नाव का घेतलं नाही?

झिशान सिद्दीकी यांनी बिश्नोई गँग किंवा त्यांच्या कुठल्या सदस्याच नाव न घेणं यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. कारण बिश्नोई गँगने समोरुन हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.