पुण्यात तीन एसटी चालकांना का निलंबित केलं? जाणून घ्या एक्सप्रेस वे संदर्भात महत्त्वाची बातमी

0

मुंबईत काही दिवसांपूर्वी बेस्ट बस चालकाच्या चुकीमुळे एक भीषण अपघात झाला होता. बस चालकाने अनेक वाहनांना आणि नागरिकांना उडवलं होतं. काही जणांचा बस खाली येऊन चिरडून मृत्यू झाला होता. बेस्टच्या या अपघाताच्या घटनेनंतर एसटी महामंडळाने सावध पवित्रा घेतला आहे. एसटी महामंडळाने प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. पुणे विभागात अचानक मद्यपान तपासणी मोहिम राबवली. त्यात पिऊन आढळलेल्या तीन एसटी चालकांना निलंबित केलं, तर तीन जणांची चौकशी लावली आहे. पुणे विभागात स्वारगेट शिवाजीनगर आगारात ही कारवाई सुरू आहे. ब्रेथ एनलायझरद्वारे तपासणी केली. त्यात मद्यपान केलेल्या तीन चालक आढळून आले. त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे, तर 3 जणांची चौकशी सुरु आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

कोणत्याही प्रकारची अघटीत घटना घडू नये म्हणून एसटी महामंडळाने सर्व चालक व वाहक ड्युटीवर असल्यावर त्यांची ब्रेथ एनालायझरद्वारे तपासणी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे विभागातील स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारासह जिल्ह्यातील सर्व आगारातील चालक आणि वाहकांची ही तपासणी करण्यात आली. त्यावेळी 6 चालकांनी मद्यपान केल्याचे निदर्शनात आले आहे. पुणे विभागातील एसटीच्या विविध आगरातून दररोज 550 तसेच इतर आगरातून सुटणाऱ्या हजारो बसचा थांबा आहे.

एक्सप्रेस वे वरुन जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आजपासून तीन दिवस पुन्हा ब्लॉक असेल. दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वर्सोली मार्गे वळविण्यात येणार आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर डोंगरगाव- कुसगाव येथे पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी आजपासून तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरूनच सुरू राहणार आहे. दुपारी 3 नंतर मात्र मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. एक्सप्रेस वे वरून जाणाऱ्या प्रवाशांनी या ब्लॉकच्या अनुषंगाने पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.