किशोर म्हणजे ‘तरुण मुलगा’ या नावाची महती जर जाणून घ्यायची असेल तर त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोथरूड विधानसभा आणि पुणे शहरांमध्ये राज साहेब ठाकरे यांचा खंदा शिलेदार ॲड. किशोर नानासाहेब शिंदे यांचे कार्य आणि वलय पाहिले की जाणवतं. नावातच तारुण्य अंगीकृत केलेल्या या खंद्या शिलेदाराने आजपर्यंत राजकीय कारकीर्दीत अनेक चढ-उतार सहन केले पाहिले अनुभवले परंतु उरी असलेला ‘तरुण कार्यकर्ता’ हा भाव ‘वार्धक्या’कडे जाऊन दिला नाही. म्हणूनच कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये सलग चार वेळा जन आशीर्वादास राज साहेबांचा हा शिलेदार अभिमानाने आणि स्वाभिमानाने घरोघरी गेला. जय पराजयांच्यापलीकडे धोरण आणि तोरण किती महत्त्वाचे आहे याची जाण त्यांच्या कार्य कर्तृत्वाने कायमच कोथरूडवासीयांना जाणवली आहे. कोणतेही कार्य करताना समाजसेवा हेच एकमेव ध्येय अन कल्पकता ही अँड. किशोर शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळपण आजही कोथरूडकारांना आपलेसेच वाटणे ही खरी नेतृत्वाची यशोगाथा म्हणावी लागेल. अशा या ध्येयवादी अन वैचारिक बांधिलकीवर धोरण प्रचारार्थ अर्पित कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!






कोथरूड महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं म्हटलं की हक्काने एकच नाव घेतलं जातं ते म्हणजे ॲड.किशोर शिंदे यांचंच कारणही तसे भक्कमच! मराठी तरुण मुलांसाठी सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्या संघटनेकडे जमा झालेलं तरुणांचे वलय आज पुणे शहरात फक्त आणि फक्त कोथरूडमध्येच कायम राखण्याचं कसब याच नेतृत्वाने साध्य केले आहे. ऐतिहासिक संदर्भाचा विचार केल्यास किशोर या नावाला भगवान कृष्णाशी संबंधित केले जाते. भगवान श्रीकृष्णांनी ज्याप्रमाणे आपल्या सवंगड्यांवरती जीव लावला अन् प्रेम केल त्याप्रमाणेच कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक तरुण कार्यकर्त्याला ॲड. किशोर शिंदे हा आपला सवंगडीच वाटणं हे या नेतृत्वाची वेगळेपण आहे. महाराष्ट्रात प्रथमच फक्त महिलांसाठी दहीहंडी उत्सव ही कल्पकता या नेतृत्वाचे आणखी एक वेगळेपण म्हणावे लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सर्वोच्च राज्य कार्यकारणीमध्ये महत्त्वाच्या पदवी विराजमान झालेले हे नेतृत्व आजही आपल्यातील कार्यकर्ता जिवंत ठेवत तरुणांमध्येच रमतो त्यांच्यासाठीच विविध उपक्रम आणि प्रसंगी रस्त्यावरची लढाई ही हिरहिरीने लढतो. नाम विशेषणातील गुणधर्म बुद्धिमत्ता आणि तल्लख बुद्धी, प्रत्येक कामासाठी हिम्मत, व्यस्त राहणारे काम, चैलेंज अन् लोकांशी जोडणे पसंद करतात.
ॲड.किशोर नानासाहेब शिंदे या कार्यकर्त्याच्या कारकिर्दीला पैलू पडण्यास सुरुवात झाली ती २००७मध्ये त्यानंतर लगेच नव्याने निर्माण झालेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये २००९ साली क्रमांक २ ची मते घेऊन या कार्यकर्त्याने आपले वलय किती भक्कम आहे याची जाणीव समस्त कोथरूडकरांना करून दिली. त्यानंतर २०१२ मधील महापालिका निवडणुकीत दोन्ही जागा विजयी करत आपली बांधणी आणखी भक्कम करण्याचे काम केले. महाराष्ट्रामध्ये २०१४ साली सर्व पक्ष स्वतंत्र निवडणुका लढत असतानाही पक्ष विचारांची बांधणी घट्ट करण्यासाठी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये राज आदेशाचे पालन केले. त्यामुळेच पुन्हा झालेल्या पंचवार्षिक २०१९ च्या निवडणुकीमध्ये पुणे परिसरातील एकमेव मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी यांचा पाठिंबा घेऊन क्रमांक दोनची मते प्राप्त केली. २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवली मात्र पराभव झाल्यानंतरही त्यांनी आपल्या कार्यकर्ता कायम जिवंत ठेवत तरुण मुलांना एकत्र राखण्याची काम आजही केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य स्तरावर सरचिटणीस म्हणून कार्यरत असतानाच लीगल सेल च्या माध्यमातूनही उल्लेखनीय काम केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवडणुकीच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे ‘भोंगा विरोधी’ आंदोलन करण्यात आले होते त्यात सहभागी सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांना त्याच दिवशी जामीन मिळवून देण्याची ‘अनोखी कामगिरी’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लीगल सेनेने जोखमी ने पार पाडत आपल्या संघटन कौशल्याची चुणूक निर्माण केली. आजही संपूर्ण महाराष्ट्रात मनसे कार्यकर्त्यांना कायदेशीर सल्ला देण्याचे काम या लीगल सेलच्या वतीने केले जात आहे. 2007 आणि 2012 या नगरसेवकपदाच्या काळात रस्ते, रुग्णालय, उद्यान, स्मशानभूमी अशा पायाभूत सुविधांची कामे मार्गी लावत कोथरूडचा विकास योग्य दिशेने करण्यासाठी या नेतृत्वाने आपले आयुष्यात केले आहे. कोथरूड शिवजयंती महोत्सव व संगम तरुण मंडळाचे ते अध्यक्ष आहेत दरवर्षी फक्तं महिलांसाठी दहीहंडी उत्सव आयोजित केला जातो.











