काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?

0

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी दररोज नवं नवीन खुलासे होत आहेत. देशमुख हत्येप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आलीय. पण अद्याप आरोपी कृष्णा आंधळेला ताब्यात घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. अटकेतील आरोपींची सीआयडी आणि एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. अशात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड कसा फरार झाला याबद्दलचा एक सीसीटीव्ही फूटजे समोर आलाय.

वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड शिवलिंग मोराळेंच्या कारमधून राज्यभर फिरला, अशी सूत्रांची माहिती आहे. दोन सीसीटीव्ही फूटजे समोर आले आहेत, यात तिच कार दिसतंय, जी मोराळेंची असून याच्या कारमधूनच वाल्मिक सीआयडीसमोर शरण आले होते. शिवलिंग मोराळेंची कार वाल्मिकसोबत राज्यभर कसा फिरला असा प्रश्न उपस्थितीत होतोय. मोराळेंचीच कार अजित पवारांच्या ताफ्यात होती, का असा प्रश्नही उपस्थितीत होतोय. शिवलिंग मोराळेंच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्हं निर्माण झालंय. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान त्यापूर्वी शिवलिंग मोराळेंनी बदनामीचा आरोप केला होता.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

दरम्यान तपास यंत्रणेवर भरोसा राहिला नाही, असं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. ‘वाल्मिक कराड राजकीय वरदहस्ताने उपचार सुविधा उपभोगतो, असं आरोप करत धनंजय देशमुखांनी तपासाबाबत शंका व्यक्त केलीय. आरोपींची सीसीटीव्ही समोर येतात मग पोलिसांना का मिळत नाही, असा सवालही देशमुखांनी विचारलाय.