सैफ अली खान हल्ला प्रकरणात टर्निंग पॉइंट; CCTV मध्ये दिसणारा अन् अटकेतील आरोपी वेगळे, काय म्हणतायत फॉरेन्सिक तज्ज्ञ?

0
8

अभिनेता सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी सातत्याने नवनवीन अपडेट्स येत आहेत. पाच दिवसांच्या उपचारानंतर सैफला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तर दुसरीकडे पोलिसांकडून याप्रकरणाची कसून चौकशी होत आहे. अशातच आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचे वकील नागेश मिश्रा यांनी दावा केला की, सीसीटीव्ही फुजेटमध्ये दिसणारा आरोपी आणि अटक करण्यातथ आलेला आरोपी यांच्या दिसण्यात बरीच तफावत आहे. प्रथमदर्शनी हे स्पष्ट पहायला मिळतंय की 16 जानेवारीच्या सीसीटीव्हीमधील हल्लेखोर आणि पोलिसांनी पकडलेला आरोपी या दोघांच्या चेहऱ्यात बराच फरक आहे. मात्र आरोपीने स्वत:हून गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांच्या चौकशीला आव्हान देऊ शकत नाही, असं वकिलांनी म्हटलंय. त्याचसोबत कोर्टात पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीला फारसं महत्त्व नसतं, बाकी अशा खटल्यात कोरेब्रिटी एविडन्स द्यावे लागतात, अशी माहिती वकिलांनी दिली.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

सैफ अली खानच्या या खटल्यात आता त्याच्या घरातील सदस्यांचे, नोकर-चाकरांचे जबाब नोंदवले जातील. यादरम्यान कारागृहातील आयडी परेडमध्ये आरोपीला ओळखावं लागतं. त्याच्याच उंचीच्या आणि शरीरयष्टीच्या अनेक लोकांना उभं केलं जातं आणि कुटुंबातील सदस्य किंवा प्रत्यक्षदर्शींच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली जाते. फॉरेन्सिक एक्सपर्ट रजनी पंडित यांच्या मते, जोपर्यंत समोरासमोर दोघांना पाहत नाही, तोपर्यंत दोघं एकच आहेत असं म्हणता येणार नाही. फोटोंमध्ये प्रकाश, अँगल यांमुळे खूप फरक पडतो. हेअरकटमुळेही चेहरा बदलतो. मुख्यत: ज्यांनी आरोपीला पाहिलंय, त्यांनी त्याची ओळख पटवली, तर ते महत्त्वाचं ठरेल, असं त्या म्हणाल्या.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

मुंबई फॉरेन्सिक सायन्स विभागाच्या संचालिका रुक्मिणी कृष्णमूर्ती म्हणाल्या, “फॉरेन्सिक वैज्ञानिक असल्याने आम्ही अशा निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही. मला वेगळं वाटलं तरी मी तसं बोलणार नाही. त्यासाठी योग्य विश्लेषण केलं जातं. ज्यामध्ये अनेक पैलू तपासून पाहिले जातात. केशरचना, कपाळ, डोळे, नाक, हनुवटी या प्रत्येक गोष्टीची डिजिटल तुलना केली जाते. यासाठी सॉफ्टवेअर वापरले जातात आणि केवळ तज्ज्ञच हे विश्लेषण करू शकतात. केवळ बघून मी काही सांगू शकणार नाही.”