कोट्यवधींची ‘ही’ मालकीण साध्या अंदाजात पोहोचली कुंभमेळ्यात ; सुती साडी, खांद्यावर छोटीशी बॅग

0
1

गेल्या आठवड्यापासून ( 13 जानेवारी) उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू झालेल्या महाकुंभमेळ्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.एकूण 45 दिवस चालणाऱ्या या कुंभमेळयात देशभरासह विदेशातील लाखो लोकांनी हजेरी लावली असून येत्याकाळातही अनेक भाविक हजर राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील लवकरच या कुंभमेळ्यासाठी हजर राहणार आहेत. अशातच आता प्रसिद्ध लेखिका, कोट्यावधी लेखिका सुधा मूर्ती याही या कुंभमेळ्यासाठी हजर राहिल्या आहेत. कोट्यवधींची संपत्ती असूनही साधीशी साडी, खांद्यावर छोटीशी बॅग अशा साध्या पेहरावात त्याचा कुंभमेळ्यासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांचा साधा सोपो, कोणताही बडेजाव नसलेला अंदाज पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. यावेळी त्यांनी आपण 3 दिवस संगमावर स्नान करणार असल्याचं तसंच आपल्या पूर्वजांसाठी तर्पण करणार असल्याचंही नमूद केलं.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

या कुंभमेळ्यासाठी मी खूपच उत्साहित आहे, 144 वर्षांतून एकदाच हा योग येतो. मला खूप आनंद , उत्साह वाटतोय.मी तीन दिवस या कुंभमेळ्यासाठी आले असून संधि मिळाली तर गंगेत , संगमात मी जरूर डुबकी घेऊन, असे सुधा मूर्ती यांनी नमूद केलं. मला कुंभमेळ्यात सहभागी होता आलं, याचा आनंद आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

नारायण मूर्ती-सुधा मूर्ती यांची संपत्ती

इन्फोसिसचे संस्थापक आणि सुधा मूर्ती यांचे पती नारायण मूर्ती यांची संपत्ती 5 अब्ज डॉलर्स (सुमारे 36,690 कोटी रुपये) आहे. एवढी संपत्ती असूनही जोडपं अतिशय साधं, सोपं जीवन जगतात. विशेष म्हणजे, सुधा मूर्ती यांनी गेल्या 30 वर्षात त्यांच्या कमाईतून कधीही नवीन साडी खरेदी केली नाही आणि त्या नेहमी साधी साडी नेसतात.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

शाही स्नान कधी ?

13 जानेवारी रोजी सुरू झालेला कुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक महाकुंभात सहभागी होत आहेत. येत्या काही काळात भाविकांची संख्या आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. 29 जानेवारी मौनी अमावस्येच्या दिवशी दुसरे शाही स्नान पार पडणार आहे. तर 3 फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या दिवशी तिसरं, 12 फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमा असून त्या दिवशी चौथं आणि 26 फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी पाचवे अर्थात शेवटचं शाही स्नान होणार