मकोका गुन्ह्या जामिनावर सुटलेल्या डिलीव्हरी बॉयचा कारनामा पोलिसही हादरले; 150 हिरे, 86 तोळे सोनं, 3.5 किलो चांदी

0

पुण्यात एका डिलीव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. याच्याकडून पोलिसांनी 150 हिरे, 86 तोळे सोनं, 3.5 किलो चांदी, बाईक यासह रपोडो रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.  डिलीव्हरी बॉयचे कपडे घालून घरफोडी करणारी टोळीच पोलिसांनी जेरबंद केली आहे.  पुणे पोलिसांची या वर्षातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

या करावाई दरम्यान पुणे पोलिसांनी 3000 पेक्षा अधिक सीसीटिव्ही फुटेज तपासले आहेत.   आरोपींकडून 86 तोळे सोन्याचे दागिणे, 150 हिरे, 3.5 किलो चांदी, 1 दुचाकी वाहन, 2 पिस्तूल आणि 5 जिवंत राऊंड तसेच घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे हस्तगत केली आहेत.  असा 1 कोटीहून अधिक किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.  गणेश काठेवाडे, सुरेश पवार आणि अजय राजपूत असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

काठेवाडे हा यातील मास्टरमाईंड आहे. त्या अनुषंगाने तपास करत असताना तब्बल 3000 सीसीटिव्हीचे फुटेज तपासण्यात आलं. तोच झोमॅटो डिलीव्हरी बॉय बनून सोसायट्यांमध्ये रेकी करायचा.आरोपीने विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. स्वतःची ओळख लपविण्यासाठी काठेवाडे हा उच्चभ्रू सोसायटीमध्ये रहात असल्याचे भासवत होता.

या घरफोडी प्रकरणात काठेवाडे याचा साथीदार सुरेश पवार याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. या दोघांची ओळख कारागृहात झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर पुण्यातील विविध ठिकाणी घरफोडी करण्याचे दोघांनी ठरवले होते. याच प्रकरणात सोने विक्री करणारा व्यवसायीक अजय राजपूत याला सुद्धा अटक करण्यात आली आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

या संपूर्ण प्रकरणी सखोल चौकशी स्वारगेट पोलिसांकडून सुरू आहे. गणेश काठेवाडे हा मोक्का गुन्ह्यामधून जामिनावर सुटलेला असून त्याच्यावर पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण हद्दीमध्ये 55 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गणेश काठेवाडे घरफोडी करण्यापुर्वी झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जावून रेकी करायचा. त्याचप्रमाणे पोलीस सी सी टिव्ही चेक करुन आपल्या पर्यंत पोहचू नयेत यासाठी तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना सुमारे 40 ते 50  कि.मी. चा प्रवास करुन यायचे. घरफोडी करुन जाताना पन्हा 40 ते 50 कि.मी. चा प्रवास करून परत जायचे.

अधिक वाचा  मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?

घरफोडी दरम्यान स्वतःची ओळख लपविण्यासाठी जॅकेट, केसांचा विग, टोपी परिधान करुन संपूर्ण वेशभूषा बदलत बदलायचे. चोरीचा मुद्देमाल विकून त्यातून आलेले पैसे गोवा तसेच इतर ठिकाणी मौजमजेसाठी उडवायचे.  आरोपींनी काही पैसे शेअर मार्केटमध्ये (इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये) गुंतवल्याचे निष्पन्न झालं आहे.