केज तालुक्यात हाणामारी सुरुच दोन गट भिडले; चाकूसह गावठी पिस्टल जप्त

0

आडस येथे ता.११ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दोन गटात वाद झाला या वादात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून सदरील गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आले आहे. ता.१२ रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी १५ जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील केज तालुक्यातील आडस येथे ता.११ रोजी दोन गटात वाद झाल्याचे पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली यावेळी धारुर येथील पोलीस अधिकरी व अंमलदार हे सदर ठिकाणी जावुन दोन गटातील वाद मिटवला. झालेल्या वादात मार लागल्याने वैद्यकिय तपासणी करुन घटनेतील जखमी आकाश विश्वनाथ आकुसकर वय (२९) यांच्या फिर्यादी वरुन धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपी गौरव मलिकार्जुन आकुसकर,संघर्ष शिवदास आकुसकर,सोन्या शिवशंकर आकुसकर, सुरज भारत पतरवाळे यांना तात्काळ अटक करण्यात आली.

अधिक वाचा  एरंडवण्यात दिवाळीनिमित्त आपुलकीचे नाते दृढ करणारा भाऊबीजेचा सण; चंद्रकांतदादांच महिला भगिनींतर्फे औक्षण

या वादात गौरव मलिकार्जुन आकुसकर रा. आडस यांचे कडे असलेलस चाकु व पिस्टल जप्त करण्यात आले आहे. विरोधी गटाचे फिर्यादी संघर्ष शिवदास आकुसकर वय (२४) वर्षे रा.आडस ता. केज यांचे फिर्यादी वरुन पोलीस ठाणे येथे प्रमाणे परस्पर विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक नवनित काँवत,अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके,सहा.पोलीस अधीक्षक कतलेश मीना,उपविभागीय पोलीस अधिकारी केज यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे.धारुर प्रभारी अधिकारी देविदास वाघमोडे, एस.आर.सर्जे यांनी आरोपींना अटक करुन ता.१२ रोजी मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची दिनांक ता.१५ पर्यंत पोलीस कस्टटी मंजुर केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

अधिक वाचा  जनशक्ती पुढे महाशक्ती पराभूत! जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होणार, नैतिकता अखेर जागृत व्यवहारातून बाहेर पडण्याचा विशाल गोखलेंचा निर्णय