‘महाराष्ट्र केसरी’त रेल्वे सैन्यदल पैलवानांना नो एंट्री; ‘ग्रीकोरोमन’ विजेत्यांना मनाई

0

कोल्हापूर : अधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणती, या विषयाभोवती चर्चेचे गुऱ्हाळ रंगलेले असताना, नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा केली आहे.घाने पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे ७ ते १० नोव्हेंबर २०२३ ला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा घेतली होती. त्यात आर्मीचे पाच पैलवान दुचाकीचे मानकरी ठरले होते. येत्या २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अहिल्यानगरात ही स्पर्धा होणार असून, संघाने रेल्वे, सैन्यदल व ग्रीकोरोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पदक विजेत्या पैलवानांना स्पर्धेत प्रवेश नाकारला आहे.

या पैलवानांची संघाला एवढी भीती कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. प्रवेश नाकारून संघाला काय साध्य करायचे आहे? याचे कोडे पैलवानांना सुटेनासे झाले आहे. महाराष्ट राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार व सचिव बाळासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होते. या परिषदेच्या कारभारावर ताशेरे ओढत भारतीय कुस्ती महासंघाने अस्थायी समितीची स्थापना केली होती.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

ही समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या नावाने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करत आहे. खासदार रामदास तडस संघाचे अध्यक्ष, संदीप भोंडवे कार्याध्यक्ष, तर योगेश दोडके सरचिटणीस आहेत. संघ व परिषद यांच्यातील अंतर्गत वाद मिटला नसल्याने दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळण्याची संधी मात्र पैलवानांना मिळत आहे. बक्षिसापोटी पैलवान दोन्ही स्पर्धांत उतरत आहेत. यातील अधिकृत व अनधिकृत स्पर्धेचे प्रश्‍नचिन्ह मात्र कायम आहे.

संघाने सर्व शहर जिल्हा संघांना निवड चाचणी स्पर्धा घेऊन गादी व माती विभागातून पैलवानांच्या प्रवेशिका २५ जानेवारीपूर्वी पाठविण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेत ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ किलो गट असणार आहेत. महाराष्ट्र केसरीचा ८६ ते १२५ किलो गट असेल. कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यांना स्पर्धेसाठी ‘अ’ व ‘ब’ असे दोन संघ पाठविण्यास पात्र ठरविण्यात आले आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

सैन्यातील पैलवान दुचाकीचे मानकरी

संघाने पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे ७ ते १० नोव्हेंबर २०२३ ला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा घेतली होती. त्यात आर्मीचे पाच पैलवान दुचाकीचे मानकरी ठरले होते. त्यात रोहन पाटील (६५ किलो- सुवर्ण, माती), विनायक गुरव (७० किलो- सुवर्ण, गादी), सोनबा गोंगाणे (६५ किलो- सुवर्ण, गादी), राकेश तांबोळकर (७४ किलो- सुवर्ण, गादी), सुशांत तांबोळकर (९७ किलो- सुवर्ण, गादी) यांचा समावेश होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे कोथरुडला ७ ते ११ जानेवारी २०२३ ला झालेल्या स्पर्धेतही सोनबा गोंगाणे, विनायक गुरव, ओंकार चौगले, भरत पाटील यांनी दुचाकी मिळवली होती. परिषदेने धाराशिवला १६ ते २० नोव्हेंबर २०२३ ला घेतलेल्या स्पर्धेत पुन्हा सोनबा, ओंकार, कुमार शेलार, विनायक गुरव यांनी बुलेट जिंकली होती.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

अनेक पैलवान विजेते…

सैन्यदलाचे पैलवान रघुनाथ पवार, अशोक शिर्के, सिकंदर शेख, पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी, तर शैलेश शेळके, प्रवीण शेवाळे उपमहाराष्ट्र केसरीचे मानकरी झाले. रेल्वेचे पैलवान अमोल बुचडे, योगेश दोडके हिंदकेसरी असून, बापू लोखंडे, उदयराज यादव, शिवाजी पाचपुते, राहुल काळभोर, दत्तात्रय गायकवाड महाराष्ट्र केसरी तर रवींद्र पाटील, विष्णू भंडारी, दिलीप पवार, मदार नदाफ, युवराज वाघ, विकी जाधव उपमहाराष्ट्र केसरी आहेत. असे असताना सैन्य व रेल्वेतील पैलवानांना प्रवेश का नाही, हाच प्रश्‍न निर्माण झाला आहे.