संतोष देशमुख प्रकरण; सीआयडीच्या मोठ्या हालचाली सुरू, वाल्मिक कराडला मकोका लागणार?

0

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सीआयडीने सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यासह इतरही आरोपींवर या आधी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील अनेक गुन्हे या आरोपींनी एकत्रितपणे कट रचुन केल्याचे दिसून येत असल्याने सीआयडीकडून या टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसे घडल्यास वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे संतोष देशमुख हत्याप्रकरणात पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

मकोका कायदा लागल्यास काय कारवाई होते?

या कायद्यानुसार सुपारी देणे, खून, खंडणी, अमली पदार्थाची तस्करी, हप्ता, खंडणीसाठी अपहरण असे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मकोका लावला जातो. गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मोक्का लागल्यावर काय शिक्षा मिळते ?

मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. भारतीय दंड विदान संहीतेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच सिक्षा मोक्काच्या कलम 3 (1) नुसार देता येईल. ही सिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते. त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यांतचा असतो. तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे. संघटीत गुन्हेगारी करुन जर आर्थिक फायदा घेतला जात असेल कींवा टोळी तयार करुन जर गुन्हेगरी करत असाल तर त्या संदर्भात मोक्काची तरतूद केली आहे.

वाल्मिक कराडांसोबतची जवळीक भोवली, एपीआय महेश विघ्नेंसह दोघांना SIT पथकातून बाहेरचा रस्ता

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी गठित करण्यात आलेल्या विशेष तपास पथकातील (एसआयटी) पोलीस अधिकाऱ्यांचे आरोपी वाल्मिक कराड याच्याशी लागेबांधे असल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार एसआयटी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विघ्ने आणि मनोज वाघ SIT टीममधून बाहेरच रस्ता दाखवण्यात आहे. पोलीस अधिकारी महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड याच्यासोबतचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वाल्मिक कराड यांच्याशीच लागेबांधे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना एसआयटी पथकात स्थान दिल्यामुळे विरोधकांनी रान उठवले होते.