2024 मध्ये भारतात लॉन्च झाल्या ‘या’ शानदार गाड्या; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

0

भारतात 2024 मध्ये  ऑटो इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल झालेला आहे. अनेक बहुप्रतिक्षित आणि नवीन गाड्या भारतामध्ये लॉन्च झालेल्या आहेत. भारतातील अनेक लोकांनी त्या खरेदी देखील केलेल्या आहेत. अत्यंत चांगले फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये या गाड्या भारतामध्ये लॉन्च झालेल्या आहेत. आज आपण 2024 च्या शेवटी संपूर्ण वर्षात कोणत्या गाड्या भारतात लॉन्च झालेल्या आहेत. हे जाणून घेणार आहोत त्यांच्या किमती आणि फीचर्स देखील जाणून घेणार आहोत.

Mahindra XEV 9e आणि BE 6e

Mahindra XEV 9e आणि BE 6e 26 नोव्हेंबर 2024 मध्ये भारतात लॉन्च झालेल्या आहे. महिंद्राने शेवटी XEV 9e आणि BE 6e इलेक्ट्रिक कार त्याच्या उप-ब्रँड्स XEV आणि BE च्या बॅनरखाली सादर केल्या आहेत. BE 6e ची किंमत रु. 18.90 लाख आहे, तर XEV 9e ची किंमत रु. 21.90 लाख आहे. दोन्ही इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये अनेक सेगमेंट फर्स्ट वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत. आणि विविध प्रकारचे पॉवरट्रेन पर्याय प्रदान करण्यात आले आहेत, ज्याच्या आधारे ते मर्सिडीज-बेंझ EQA आणि BMW ix1 सारख्या प्रीमियम इलेक्ट्रिक कारला कठीण स्पर्धा देऊ शकतात. महिंद्राने अनेक प्रीमियम फीचर्स प्रदान केले आहेत या इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांमध्ये ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) आधारित हेड-अप डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

Honda Amaze 8

Honda Amaze चे नवीन जनरेशन मॉडेल 6 डिसेंबर रोजी लाँच करण्यात आले. ही होंडा कार एका नव्या रुपात बाजारात आली आहे. नवीन Honda Amaze ची किंमत 8 लाख रुपयांपासून सुरू होते. जसजसे त्याचे प्रकार वाढत जातात, तसतसे त्याची वैशिष्ट्ये देखील वाढतात. नवीन अमेझ छान दिसत आहे. ही कार होंडा एलिव्हेट आणि होंडा सिटीचे कॉम्बिनेशन म्हणता येईल. या वाहनात एलईडी लाईट आणि 15-इंच चाके वापरण्यात आली आहेत, ज्यामुळे या कारच्या रस्त्यावरील उपस्थितीत आणखी सुधारणा झाली आहे. या कारची लांबी केवळ 4 मीटरच्या मर्यादेत ठेवण्यात आली आहे. ही कार ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनच्या पर्यायासह येते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

Skoda Kayak SUV

Skoda Auto India ने भारतीय बाजारपेठेत Kayak SUV लाँच केली आहे, जी सब-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी मारुती सुझुकी ब्रेझा तसेच टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सोनेट सारख्या वाहनांशी स्पर्धा करते. Skoda Kaylak च्या फक्त बेस व्हेरिएंटची किंमत 7,89,000 रुपये आहे. Kaylak चे बुकिंग 2 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. Skoda Kaylak मध्ये 1.0 लिटर TSI पेट्रोल इंजिन आहे, जे 85 kW ची कमाल पॉवर आणि 178 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करेल. कायलाकमध्ये 6 स्पीड मॅन्युअल तसेच 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय असतील. कायलाक मायलेजच्या बाबतीतही चांगला असल्याचा कंपनीचा दावा आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

Maruti Suzuki Dzire

मारुती सुझुकीची सर्व नवीन डिझायर सेडान 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाली आहे आणि तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.79 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत अनेक नवीन वैशिष्ट्यांसह आणि उत्तम लुक-डिझाइनसह, मारुती सुझुकीची पहिली 5 स्टार सुरक्षा रेटिंग असलेली ही कार खास आहे आणि भविष्यात सेडान सेगमेंटला नवीन उंचीवर नेऊ शकते. मारुती सुझुकीची नवीन Dezire दोन CNG प्रकारांसह LXI, VXI, ZXI आणि ZXI Plus सारख्या 4 ट्रिम्समध्ये एकूण 9 प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. त्यांची एक्स-शोरूम किंमत 6.79 लाख ते 10.14 लाख रुपये आहे. ही कॉम्पॅक्ट सेडान सिल्व्हर, ग्रे, ब्लॅक, ब्लू, व्हाईट, रेड आणि ब्राऊन अशा 7 आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. या कारचे बुकिंग सुरू असून डिलिव्हरी सुरू होणार आहे.