अनेक लोक तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटी, अभिनेते आणि खेळाडूंना फॉलो करतात. लोकांना नेहमी जाणून घ्यायचे असते की त्यांचे आवडते स्टार स्वतःला फिट ठेवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी कोणत्या डाएटचा वापर करतात.2024 मध्येही अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे वजन कमी केले आणि त्यांच्या फिटनेसने लोकांना आकर्षित केले. या वर्षी वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटींनी कोणत्या डाएटचा समावेश केला हे सविस्तरपणे जाणून घेऊया.






डिटॉक्स डाएट
शरीरात साचलेले टॉक्सिन्स स्वच्छ केल्याने अनेक आजारांचा धोका तर कमी होतोच पण तुमचे वजनही नियंत्रणात राहते. 2024 मध्ये डिटॉक्स डाएटला खूप पसंती मिळाली. आलिया भट्टसारख्या स्टार्सने हर्बल टी, ग्रीन ज्यूस आणि सूपच्या मदतीने डिटॉक्स डाएट फॉलो केला आहे.
लो कार्ब डाएट
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला देसी खाद्यपदार्थ आवडतात. पण देसी चवीसाठी ती कार्ब्सचे सेवन कमी करते. सारा असे पदार्थ खाते जे स्थानिक मसाल्यांनी स्थानिक पद्धतीने तयार केले जातात. परंतु ज्यामध्ये गव्हाचे पीठ आणि तांदूळ कमीत कमी वापरले जातात. या प्रकारच्या लो-कार्ब भारतीय डाएटमध्ये अंडी, चीज, कडधान्ये आणि भाज्या यांचा समावेश होतो.
किटो डाएट
केटोजेनिक किंवा केटो डाएट हे सेलिब्रेटी आणि फिटनेस फ्रिक्स जास्त फॉलो करतात. तमन्ना भाटियाने यावर्षी केटो डाएटच्या मदतीने वजन कमी केले. केटो डाएटमध्ये जास्त फॅट पण कमी कार्बयुक्त पदार्थ घेतले जातात. ज्यामुळे एनर्जी मिळण्यास मदत मिळते.
प्लांट बेस्ड डाएट
शाकाहारी आणि वीगन डाएट हा नेहमीच ट्रेंडमध्ये राहिला आहे. 2024 मध्ये, श्रद्धा कपूरने प्लांट बेस्ड डाएट आहाराच्या मदतीने स्वतःचे वजन निंयत्रणात ठेवले आहे. या प्रकारचा आहार केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका देखील दूर ठेवतो.
इंटरमिटेट फास्टिंग
बॉलीवूडची फिटनेस आयकॉन मलायका अरोरा हिने 2024 मध्ये इंटरमिटेट फास्टिंग डाएट फॉलो केला होता. ती अनेकदा याबद्दल बोलत असते. इंटरमिटेट फास्टींग करताना, लोकांना एकदा खाल्ल्यानंतर 16 तासांनंतरच दुसरे जेवण करण्याचा सल्ला दिला जातो.
तळटीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. Newsmekar.live अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.











