पुणे कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ; 2 चिमुकल्या बहिणींची हत्या, घराबाहेर खेळताना गायब झाल्या अन्…

0

मागील अनेक दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यातून अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर संशय व्यक्त केला जात आहे. अशातच आता राजगुरूनगरमध्ये 2 मुलींची निघृण हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

या घटनेमुळे आता नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही मुली घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर मुली दिसेनात म्हणून पालकांनी त्यांना शोधायला सुरुवात केली. मात्र, खूप शोधाशोध करूनही या मुली सापडल्या नाहीत. अखेर रात्री उशीरा शहराबाहेर एका इमारतीच्या बाजूला या मुलींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे राजगुरूनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

हत्या झालेल्या मुलींची नावे दुर्वा आणि कार्तिकी मकवाने अशी आहेत. तर या दोन चिमुरड्या मुलींची ह्या का केली? तसंच त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्यात आला का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून याबाबतचा तपास आता पोलिस करत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी घराजवळ खेळत असलेल्या दुर्वा आणि कार्तिकी दोन्ही बहिणी अचानक बेपत्ता झाल्या. मुली दिसेनात म्हणून पालकांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरूवात केली. दुपारपासून शोधाशोध केल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहराजवळ असलेल्या एका इमारती जवळ या दोन्ही बहिणींचे मृतदेह ड्रममध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले. दरम्यान, राजगुरुनगर पोलिसांनी दोन्ही मुलीचे मृतदेह शवच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार