खातेवाटप जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर, मंत्रालयात सकाळपासून बैठकांचा धडाका

0

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप शपथविधी अशा अनेक राजकीय घडामोडींना वेग आला होता. महायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतील मंत्रालयातील दालनांच वाटप करण्यात आलं. खाते वाटपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले आहेत. आज मंगळवारी सकाळपासूनच मंत्रालयात बैठकांचा धडाका लावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थ खात्याचा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेतला. अजित पवार यांनी सुरुवातीला राज्य उत्पादन शुल्क विभागाची बैठक घेतली. यापूर्वी हे खातं शंभूराजे देसाई यांच्याकडे होतं. आता अजित पवारांकडे हे खाता आल्यानंतर खात्याच्या सचिवांना बोलावून त्यांच्याकडे खात्याचा आढावा घेतला. यानंतर ते अर्थ खात्याची बैठक घेणार आहेत.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार, हिवाळी अधिवेशन, राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झाल्यानंतर आता महायुती सरकार राज्यकारभाराला लागलं आहे. राज्याच्या अर्थ खात्याचा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पदाभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेत दोन्ही खात्यांचा आढावा घेतला. दरम्यान राज्यातील मंत्रिमंडळ आपापल्या खात्याचा पदाभर स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले आहेत.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वीकारणार पदाभार

खातेवाटपानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. आज सकाळपासून मंत्रालयात बैठकांचा धडाका सुरू असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही पदाभर स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल झालेत. महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर ते राज्याच्या परिवहन खात्याचा पदभार स्वीकारतील.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

महायुतीच्या मंत्र्यांना दालनांचे वाटप

महायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतील मंत्रालयातील दालनांचं वाटप करण्यात आले आहे. मंत्रालयातील चर्चेत असलेलं 602 क्रमांकाचं दालन शिवेंद्रराजे भोसले यांना मिळालं आहे. सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये त्यांना 601, 602 आणि 604 अशी तीन दालनं शिवेंद्रराजेंना देण्यात आली आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 602 क्रमांकाचे दालन कायम चर्चेत असतं. दरवेळच्या दालन वाटपावेळी हे समोर येतं की ते दालन घेण्यासाठी कोणतेही मंत्री उत्सुक नसतात. कारण या दालनाबद्दल शुभ-अशुभ अशी चर्चा कायम चर्चेत असते. या दालनात आलेला मंत्री पुन्हा मंत्री होत नाही, असं 2014 पासून पाहायला मिळतं. खरंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनानंतर हे सर्वात मोठं दालन आहे. पण तिथे कोणीही जाण्यास तयार होत नाही. त्यामुळे आता शिवेंद्रराजे भोसले हे दालन स्विकारणार का हे पाहावं लागेल.

अधिक वाचा  मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?