मंत्रिमंडळातून डच्चू? शिंदेंचा विश्वासू शिलेदार संतापला, म्हणाला, ”नापास असूच शकत नाही, मी जनतेसाठी…”

0

राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. सत्ता वाटपाचा तिढा कायम आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराकडे सत्ताधारी महायुतीच्या आमदारांचे लक्ष लागले आहे. येत्या 14 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना बंडात साथ देणाऱ्या विश्वासू शिलेदारांच्या मनातही धाकधूक वाढली आहे. मागील मंत्रिमंडळातील काहींना यंदा मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांचा विश्वासू शिलेदार मात्र, या वृत्ताने संतापला आहे.

शिंदेंच्या काही मंत्र्यांना मिळणार डच्चू?

महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाचा आणि संभाव्य मंत्र्यांच्या नावावरून खल सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेतील काहीजणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपने विरोध केल्याचे वृत्त आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मागील सरकारच्या मंत्र्यांचे मूल्यमापन करणारे प्रगती पुस्तक समोर आले. यामध्ये संजय राठोड यांच्या नावा समोर नापास असा शेरा लावण्यात आला. त्यावर आमदार संजय राठोड यांनी संताप व्यक्त केला आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मी नापास होऊ शकत नाही…

निवडणुकी नंतर मंत्रिमंडळ स्थापनेच्या आधी संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून डावलणार असल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर आता संजय राठोड हे स्वतः हुन पुढे आले आहेत. त्यांनी स्वतः केलेल्या कामाची माहिती देत मी नापास झालोच नाही अशी भूमिका सांगितली आहे. माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यामुळे आपण व्यथित झालो असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले. संजय राठोड यांनी म्हटले की, प्रगती पुस्तकात मी नापास अशा बातम्या जिव्हारी लागणाऱ्या आहे. मी नापास असूच शकत नाही, मी जनतेसाठी झोकून देऊन काम करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा