मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ…

0

माजी केंद्रीयमंत्री व दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्याच्या आठवणी जागवल्या. तसेच, पत्रकारांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरे देखील दिली. मुंडे साहेबांच्या माझ्या मनातील ज्या भावना आहेत त्याबाबत मी सोशल माध्यमातून व्यक्त केले आहे. माझ्या वडिलांनी केवळ माझ्यावर नाही तर असंख्य लोकांवर प्रेम केले, असंख्य लोकांना आधार दिला. असंख्य लोकांच्या जीवनात बदल घडवले आहेत. ती परंपरा चालवणं आणि ते कर्तव्य पूर्ण करणे यासाठीच मी काम करत असल्याचं पंकजा यांनी म्हटलं. तसेच, मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी भाष्य केलं.

मुंडे साहेबांना जाऊन अकरा वर्षे झाले तरी इतक्या मोठ्या संख्येने लोक येतात हे भाग्य असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. दुसरीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वेगाने सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या चर्चा व बैठका सुरू आहेत. त्याच अनुषंगाने मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतची ऑफिशियल तारीख माहीत नाही, आणि कुणाचे नाव हेही माहित नाही. त्याबाबत केंद्रीय नेतृत्व ठरवेल आणि घोषणाही करेल. मी 2014, 2019 आणि आत्ताच्या निवडणुकीत परिश्रम घेतले आहेत. पक्षाने सांगितलेले काम मी केले आहे. मोदीजींनीच मला स्टार प्रचारक केले होते. पक्षाने जे काम मला दिलं ते विचारांतीच दिलं असेल, त्याची मी पूर्तता केली. हे यश माझं नाही तर भाजप कार्यकर्त्याचं आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाबाबत भूमिका मांडली. अप्रत्यक्षपणे आपण काम केलंय, त्यामुळे आपणास मंत्रीपद मिळेल, अशी सुप्त इच्छा त्यांच्या बोलण्यातून जाणवल्याचं दिसून येतं.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

संतोष देशमुख हत्येबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार

दरम्यान, केज तालुक्यातील मसाजोग घटनेविषयी मी तीव्र संताप व्यक्त करते. हृदयातून दुःख वेदना शोक व्यक्त करते. त्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे. माझा परिवार आणि मी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून त्यांना न्याय मिळवून देण्याबाबत बोलणार आहे, असेही पंकजा यांनी म्हटले. देशमुख हत्तेवरून राजकारण तापले नाही पाहिजे ती घटना दुर्दैवी आहे. त्यांच्या आईवर, परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या पत्नीकडे दुःख, संताप या पलीकडे काही दिसत नाही. बीडची बदनामी कोणी करू नये, राज्यभरात घटना होत असतात. आम्ही त्या घटनेतल्या योग्य माणसाच्या पाठीमागे योग्यपणे उभे राहू , असेही पंकजा यांनी म्हटले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुजय विखे म्हणाले

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटले की, ”आम्हाला काही निरोप नाही पण निरोपाची वाट बघत नाही. साईबाबाच्या पावनभूमीत आम्हाला नेतृत्व करायची संधी आहे. प्रत्येक संधीचा लाभ सर्वसामान्य जनतेला होईल. सर्व वरिष्ठ नेत्याबद्दल आम्हाला विश्वास आहे, वरिष्ठ नेते आम्हाला न्याय देतील अशी आमची अपेक्षा आहे, असे म्हणत त्यांनी देखील मंत्रीपदाची इच्छा व्यक्त करताना संधी मिळेल असा विश्वास बोलून दाखवला.