मविआला विरोधी पक्षनेतेपद मिळेल की नाही?; विधानसभा अध्यक्ष ……संसदीय लोकशाहीसाठी नार्वेकरांचं हे वक्तव्य!

0

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, विरोधी पक्षनेतेपदसाठी आवश्यक असणाऱ्या जागा देखील महाविकास आघाडीला मिळाल्या नाहीत. त्यामुळं मविआला विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही? अशी चर्चा सुरु आहे. अशातच राहुल नार्वेकर यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. नेमकं काय म्हणालेत नार्वेकर ते पाहुयात.

विचार करुन निर्णय घेऊ

विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण असेल यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असतो. नियमात ज्या गोष्टी असतील त्याद्वारे सगळं होत असते असे राहुल नार्वेकर म्हणाले. माझ्याकडे गोष्टी आल्यास आम्ही विचार करुन निर्णय घेऊ. 288 आमदारांना न्याय दिला नाही तर जनतेबरोबर अन्याय होतोय असं वाटेल. संसदीय लोकशाहीसाठी सर्वांना न्याय देणं फार महत्त्वाचं असल्याचे नार्वेकर म्हणाले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

अडीच वर्षात सकारात्मक काम झालं, त्यादृष्टीनेच पुढील 5 वर्ष देखील प्रयत्न असणार

माझ्या कार्यकाळात सर्वाधिक लक्षवेधी मांडल्या गेल्याचे नार्वेकर म्हणाले. डिजिटलायझेशन देखील सर्वाधिक माझ्या काळात झालं आहे. अडीच वर्षात सकारात्मक काम झालं आणि त्यादृष्टीने पुढील 5 वर्ष देखील प्रयत्न असेल असंही ते म्हणाले. सेंन्ट्रल व्हिस्टा संदर्भात लवकरच विचार करु, नवीन विधान भवनासंदर्भात निर्णय विचाराधीन असल्याची माहिती देखील नार्वेकरांनी दिली.

कोणताही पक्षपात न करता निर्णय घेऊ-

शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित होते. यामध्ये वरुण सरदेसाई हे एक आहेत. ते पूर्वनियोजित दौऱ्यामुळे मुंबई बाहेर असल्याकारणाने शपथ घेऊ शकले नाहीत. तर मनोज जामसुतकर यांची तब्येत ठीक नसल्याने आणि रुग्णालयात उपचार घेत असल्याने शपथ घेऊ शकले नाहीत असे नार्वेकर म्हणाले. माझ्यावर देखील टिका झाल्या आहेत. टीका व्यतिरिक्त विरोधकांनी काही केलं नाही. मी उद्यापासून विधानसभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडेल तेव्हा साथ लाभेल असेही नार्वेकर म्हणाले. कोणताही पक्षपात न करता निर्णय घेऊ. मला आज कुठल्याही विषयावर राजकीय भाष्य करायचं नाही जनतेनं आपल्या मॅन्डेटवरुन दाखवून दिलेलं आहे, असंही नार्वेकर म्हणाले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

लोकशाहीवर विश्वास नाही म्हणून विरोधकांकडून आंदोलन

मी सर्वांचे आभार मानतो. कुठल्याही गोष्टीची जबाबदारी दिली जाते तेव्हा मेरीटवर दिली जाते आणि त्यातून माझी निवड झाल्याचे नार्वेकर म्हणाले. लोकशाहीवर विश्वास नाही म्हणून विरोधकांकडून आंदोलन केलं जात आहे. विरोधात निकाल आता तेव्हा आयोगावर खापर फोडायचे असेही ते म्हणाले. संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आणि याची काळजी घेणं गरजेचं आहे असंही नार्वेकर म्हणाले.