विधानसभेमध्ये सध्या महायुतीचे सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर आता विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदावरून भाजपने मोठी खेळी केली आहे. यामुळे आता महाविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात नवीन विधानसभा स्थापन झाली आहे. नव्याने स्थापन झालेल्या २८८ सदस्यीय विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन शनिवार, ७ डिसेंबरपासून सुरू झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पहिल्याच दिवशी सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.






विधानपरिषदेत महायुतीचे सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. 16 डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. महायुतीमधून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीच्या तीनही पक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेच्या गटनेता म्हणून निवड होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबाबाद दानवे यांच्यासाठी भाजपने ही मोठी खेळी केल्याचे बोलले जात आहे.










