आज महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची शपथविधीची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत एक गमतीशीर प्रसंग घडला, ज्यामुळे सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. भाजपचे कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने विरोधी बाकावर बसले होते.मात्र, तिथेच अजित पवार यांनी हेमंत रासने यांना हाताला धरून योग्य बाकावर बसवले.
कसब्याचा विजय
हेमंत रासने, हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यांनी कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या विजयामुळे भाजपला एक मतदारसंघात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. कसबा मतदारसंघाची परंपरागत जागा असून, याआधीही भाजपचा दबदबा होता, मात्र 2023 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने या सीटवर विजय मिळवला होता.
हेमंत रासने हे पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची ओळख झाली असून, त्यांना भाजपमध्ये एक महत्त्वाची भूमिका दिली गेली आहे.
गमतीशीर प्रसंग-
आज शपथविधी दरम्यान हेमंत रासने यांनी विधानसभा सभागृहात प्रवेश केला. सर्वसाधारणपणे, सत्ताधारी नवीन सदस्यांना सत्ताधारी बाकांवर बसावे लागते, मात्र रासने यांना विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसण्याची चूक झाली. यावेळी अजित पवार हे सभागृहात उपस्थित होते. त्यांनी हेमंत रासने यांना हाताला धरून सत्ताधारी बाकावर नेले.
हे दृश्य पाहून सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. या घटनेने जणू काही सभागृहातील वातावरण अधिक हलके केले. यावेळी हेमंत रासने यांनीही त्या क्षणी हलकेपणाने हसत बसण्याची वेळ आली आणि अजित पवार यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. हेमंत रासने यांना केवळ कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे नाही तर पुण्यातील मोठ्या नेत्यांचे समर्थन मिळालं आहे