सत्ता स्थापनेसाठी महाविकासआघाडीचा मास्टर प्लॅन! आमदार निवडून आले की थेट…

0

महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडले आहे. आता सर्वांचेच लक्ष लागले आहे ते निकालाकडे. मतदान झाल्यानंतर घेण्यात आलेल्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात सत्तापालटही होऊ शकतो किंवा महायुती पुन्हा सरकार स्थापन करु शकते असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. सत्ता स्थापन करणार असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. अशातच महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीने जबरदस्त प्लान बनवल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यश नाना पटोलेंनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय नेत्यांकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यश नाना पटोलेंनी मोठं वक्तव्य केले आहे. महाविकासआघाडीच्या विजयी उमेदवारांना मुंबईत हलवण्यात येणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. महाविकासआघाडीच्या सर्व विजयी आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये सुरक्षितस्थळी ठेवलं जाईल असं पटोले यांनी सांगितले. यानंतर येथूनच या आमदारांना थेट राज्यपालांकडे नेणार आणि सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचंही पटोले म्हणाले.

दरम्यान, राज्यात मविआचं सरकार येणार. असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. तर काँग्रेसच्या 75 जागा निवडून येतील. असा विश्वासही पटोलेंनी व्यक्त केला आहे. राज्यात महाविकास आघाडी येणार हा पटोलेंचा दावा म्हणजे ‘मुंगेरीलाल के सपने’… असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नाना पटोलेंना लगावला आहे. तर, मुळात महाविकास आघाडीत पाडापाडी झाल्याचा दावा देखील दरेकर यांनी केला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार