‘राज ठाकरेंना सोबत घेतलं असतं तर..’; फडणवीसांनी सांगितलं BJP-मनसे युती फिस्कटण्याचं खरं कारण

0

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही या निवडणुकीमध्ये जोरदार चर्चा आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सभा घेत आपल्याला जनतेनं एकदा संधी द्यावी असं सांगत आहेत. राज ठाकरेंनी 138 ठिकाणी उमेदवार दिले आहेत. राज ठाकरेंच्या प्रचाराचा जोर हा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरील टीकेवर असला तरी भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांची भूमिका मवाळ दिसत आहे. मध्यंतरी मनसे आणि भाजपा युती करणार अशी जोरदार चर्चा होती. फडणवीस आणि राज यांच्या मध्यंतरी अनेकदा भेटीगाठीही झाल्या होत्या. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र निवडणूक लढवणारच अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि दोन्ही पक्षांनी वेगवगळं निवडणूक लढवण्याचं ठरवलं. मात्र दोघांमधील युती का फिस्कटली यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

दादर-माहीमचा पेच सोडवण्यासाठी देण्यात आलेली ही ऑफर पण…

फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यावेळेस त्यांनी दादर-माहीम मतदारसंघातील मनसे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेमधील लढतीबद्दलही भाष्य केलं. माहिममधील गोंधळ सोडवण्यासाठी आपण स्वत: आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. आम्ही दोघांनी प्रयत्न केला असं सांगतानाच फडणवीसांनी, ” परिषदेवर घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सारवणकर यांना सांगितलं होतं. मात्र सारवणकर यांचं लॉजिक शिंदेंना पटलं,” असं सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “अमितला परिषदेवर घेऊ अशी ऑफर होती पण ते ठाकरे आहेत ते म्हणाले तुम्हाला द्यायचा उमेदवार तर द्या,” असं सांगण्यात आल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन